मोठी बातमी ! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्र सरकारकडून मंजुरी 

  • Written By: Published:
मोठी बातमी ! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्र सरकारकडून मंजुरी 

8th Pay Commission : एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या (Central government) या निर्णयानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे. आठव्या वेतन आयोगात (Eighth Pay Commission) कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार याबाबत सध्या माहिती समोर आलेली नाही.

मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी केंद्र सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मंजुरी दिली असल्याची माहिती दिली. लवकरच आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आठवा वेतन लागू करण्यात यावे अशी मागणी करत होते.

देशात 1947 पासून सात वेतन आयोग लागू करण्यात आले आहे. मोदी सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी 2016 मध्ये लागू केल्या होत्या. सातवा वेतन आयोग 2026 पर्यंत चालणार आहे. पण आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने एक वर्ष आधीच मान्यता दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि शिफारसी करण्यासाठी दर 10 वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना करण्यात येते आणि महागाईसह अनेक घटकांचा विचार करू कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये वाढ करण्यात येते.

‘इलू इलू’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित, एली अवराम मराठी चित्रपटात करणार पदार्पण

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2014 मध्ये सातवा वेतन आयोग स्थापन केला होता आणि 2016 मध्ये या आयोगाच्या शिफारसी मोदी सरकारने लागू केल्या होत्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube