वाल्मिक कराडप्रश्नी सुप्रिया सुळे आक्रमक; ईडी आणि पीएमएलएचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारला केलं लक्ष्य!

वाल्मिक कराडप्रश्नी सुप्रिया सुळे आक्रमक; ईडी आणि पीएमएलएचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारला केलं लक्ष्य!

Supriya Sule on Walmik Karad : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh) राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक झाली असून त्याच्यावर खंडणीअंतर्गतही गुन्हा दाखल झाला आहे. अंजली दमानिया, जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही या प्रकरणातील एक वेगळाच मुद्दा उचलून धरला आहे. या मुद्द्यावर त्या थेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशीही चर्चा करणार आहेत. आज सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी आवाज उठवलायं.

‘बिनोदिनी’मध्ये श्रेया घोषालच्या आवाजाची जादू; ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सुप्रिया सुळे म्हणाल्या, वाल्मिक कराड याच्यावर खंडणीअंतर्गत गुन्हा दाखल होता, खंडणीविरोधातला गुन्हा हा पीएमपीएल कायद्यातर्गत दाखल केला जातो. पण वाल्मिक कराड प्रकरणामध्ये ईडी आणि पीएमपीएलची अंमलबजावणी का करण्यात आली नाही? खंडणी प्रकरणी कंपनीकडून मे महिन्यातच नोटीस पाठवण्यात आली होती, तरीही ईडीकडून कारवाई करण्यात आली नाही, असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी केलायं.

टोकन वाटपाआधीच चेंगराचेंगरी, मृत्यूचा आकडाही वाढला; दुर्घटनेचं कारणही सापडलं..

या गुन्ह्यासंदर्भातील माहिती राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवली नव्हती का? त्यामुळे मी आणि बाप्पान (खासदार बजरंग सोनावणे) अर्थमंत्रालयाला पत्र लिहिणार आहोत. महाराष्ट्रात गुंतवणूक येणार असतील आणि अशी खंडणी होणार असेल तर महाराष्ट्रात गुंतवणूक कशी येणार? गुंतवणूकदारांनाही न्याय मिळणार नाही का? या प्रकरणात ईडी आणि पीएमएलएची कारवाई झाली नाही. संतोष देशमुखांची हत्या ही एक केस, आर्थिक फसवणुकीचा दुसरा गुन्हा. मग यात ईडी का गुंतली नाही? वाल्मिक कराडला सातत्याने विशेष ट्रिटमेंट का दिली जाते? मे महिन्यात जो गुन्हा दाखल झाला त्याविरोधात कारवाई झाली असती तर संतोष देशमुखांची हत्याच झाली नसती. याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube