मोठी बातमी! शरद पवारांच्या खासदारांना फोडण्याचा अजित पवारांचा प्रयत्न; सुप्रिया सुळेंकडून संताप व्यक्त

मोठी बातमी! शरद पवारांच्या खासदारांना फोडण्याचा अजित पवारांचा प्रयत्न; सुप्रिया सुळेंकडून संताप व्यक्त

Sunil Tatkare Contact Sharad Pawar MP : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (Sunil Tatkare) सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या सात खासदारांना संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. सात खासदारांची भेट घेत सोबत येण्याची ऑफर देखील सुनील तटकरे यांनी दिल्याची माहिती आहे.

शरद पवारांच्या चिठ्ठित नेमकं काय होत? भुजबळ म्हणाले, पर्दे में रहने दो

संपर्क झालेल्या सातही खासदारांनी सुनील तटकरे यांचे ऑफर नाकारल्याची माहिती देखील आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांना फोन करत तटकरे यांच्या बाबतची नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे. तर शरद पवारांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याची जबाबदारी ही सुनील तटकरे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आलेली आहे. त्या जबाबदारीचा भाग म्हणून सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे वगळता इतर सात खासदार आहेत त्या सात खासदारांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या सोबत येण्याची ऑफर दिली. तुम्ही सत्तेसोबत या असं सुनील तटकरे यांनी या सात खासदारांना सांगितल्याची माहिती आहे. दरम्यान, या भेटी स्वतंत्रपणे घेण्यात आल्याची माहिती आहे.

या भेटीबाबतची आणि ऑफर बाबतची माहिती तुम्ही कोणाला देऊ नका असेही तटकरेंनी खासदारांना म्हटलं असल्याचं बोललं जातंय. मात्र, या सातही खासदारांनी या भेटीची माहिती शरद पवारांना किंवा सुप्रिया सुळे यांना दिली. त्यानंतर मात्र सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांना फोन करून याबाबतची नाराजी व्यक्त केली. पुन्हा तुम्ही आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहात का? अशी विचारना सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांच्याकडे केल्याची माहिती आहे. या सातही खासदारांनी सुनील तटकरे यांची ऑफर धुडकावल्याची माहिती आहे. केंद्र सरकारला अधिक स्थिरता मिळावी यासाठी या सात खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube