Girish Mahajan : भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर महाजन यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. महाजन म्हणाले, संजय राऊत यांच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे यावर सर्वांचे एकमत झाले आहे. सरसंघचालकांनी आमच्यासोबत यावे असे राऊत यांनी म्हणणे म्हणजे वेड्या माणसाने बरळण्यासारखे आहे. वाटेल तसे वाटेल ते बोलायचे. त्यामुळे या माणसाच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे.
यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावरही जोरदार टीका केली. एकनाथ खडसे महिनाभर रुग्णालयात होते. ते इलाज अपूर्ण सोडून आले आहेत. खडसे सध्या खूप असंसदीय भाषेत बोलत आहेत. काहीही बोलतात. मात्र त्याची काहीच लाज शिल्लक राहिलेली नाही. चोऱ्या तुम्ही करा आणि बिल आमच्या नावावर फाडा अशी टीका त्यांनी केली.
राजस्थानमध्ये काँग्रेसला धक्का तर मध्य प्रदेशात भाजपला झटका, पाहा 5 राज्यांचे ओपिनियन पोल
विजयादशमीनिमित्त काल सावरगाव येथील भगवान भक्ती गडावर आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात (Dasara Melawa) भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी भूमिका स्पष्ट केली. दुसऱ्या पक्षात जाण्यााइतपत मी लेचीपेची नाही, असं वक्तव्य पंकजा यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्या आता भाजप सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जे वक्तव्य केलं आहे ते पक्षाच्या संदर्भात नसेल. मी नेमकं त्यांचं भाषण ऐकलेलं नाही. ऐकल्यानंतर यावर अधिक बोलता येईल असे उत्तर महाजन यांनी दिले.
कुणीही असो सोडणार नाहीच
अमली पदार्थांच्या मुद्द्यावरून महाजन यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. त्यांचेही सरकार होते. त्यांचे नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी आमच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःकडे सुद्धा पहावं. मातोश्रीवर त्या ललित पाटीलचा प्रवेश झाला होता. असं असताना आमच्यावर बेछुट आरोप करणे चुकीचे आहे. तुम्ही काहीही बोलला तरी लोकांना कळतं. अमली पदार्थांचा विषय मुळापासून संपविण्यासाठी आता सरकारने काम सुरू केले आहे. अमली पदार्थांची तस्करी किंवा व्यवसायात कुणी राजकीय पदाधिकारी असेल मग तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला सोडणार नाही, असा इशारा महाजन यांनी दिला.
Chandrashekhar Bavankule : पवारांच्या हॉस्पिटलमध्ये ठाकरे बिघडले त्यामुळे… बावनकुळेंचा टोला