राजस्थानमध्ये काँग्रेसला धक्का तर मध्य प्रदेशात भाजपला झटका, पाहा 5 राज्यांचे ओपिनियन पोल

राजस्थानमध्ये काँग्रेसला धक्का तर मध्य प्रदेशात भाजपला झटका, पाहा 5 राज्यांचे ओपिनियन पोल

Assembly Elections : पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने सोमवारी (9 ऑक्टोबर) जाहीर केल्या आहेत. यात राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरामचा समावेश आहे. यानंतर एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने घेतलेले ओपिनियन पोल समोर आला आहे.

या ओपिनियन पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेसला झटका बसू शकतो. येथे भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. तर छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे. तसेच, मध्य प्रदेशात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो, परंतु त्याची भाजपशी कडवी स्पर्धा आहे.

तेलंगणातील सत्ता बीआरएसकडून काँग्रेसकडे जाऊ शकते. याशिवाय मिझोराममध्ये कोणालाही बहुमत मिळताना दिसत नाही. अशा स्थितीत सत्ताधारी पक्ष मिझो नॅशनल फ्रंटला झटका बसू शकतो, कारण सत्तेची चावी अन्य पक्षांकडे असेल.

राजस्थानमध्ये कोणाचे सरकार स्थापन होणार?
राजस्थान विधानसभा निवडणुकीसंदर्भात घेण्यात आलेल्या जनमत चाचण्यानुसार राज्यातील 200 जागांपैकी काँग्रेसला 59 ते 69 जागा मिळू शकतात. तर भाजपला 127 ते 137 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय इतरांना 2 ते 6 जागा मिळू शकतात.

Assembly Elections : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले; 3 डिसेंबरला येणार निकाल

ओपिनियन पोलनुसार काँग्रेसला 42 टक्के मते मिळू शकतात. तर भाजपला 47 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. तसेच 11 टक्के मते इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. राजस्थानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 101 जागांची गरज आहे. सध्या राज्यात अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे.

मध्य प्रदेशात कोणाला किती जागा मिळणार?
ओपिनियन पोलमध्ये मध्य प्रदेशातील एकूण 230 जागांपैकी काँग्रेसला 113 ते 125 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 104 ते 116 जागा मिळू शकतात. तसेच माजी मुख्यमंत्री मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (BSP) 0 ते 2 जागा जिंकू शकतो. याशिवाय 0 ते 3 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी 116 जागांची आवश्यकता आहे.

Rajasthan Election : भाजपची रणनीती ठरली! राजस्थानातही MP चाच फॉर्मुला; सत्ता खेचण्यासाठी 7 शिलेदार रिंगणात

छत्तीसगडमध्ये कोणाला बहुमत मिळणार?
छत्तीसगडमध्ये काँग्रेस बहुमताचा जादुई आकडा गाठताना दिसत आहे. राज्यातील 90 जागांपैकी काँग्रेसला 45 ते 51 जागा मिळू शकतात. ओपिनियन पोलमध्ये भाजपला 39 ते 45 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतरांना 0 ते 2 जागा मिळू शकतात.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसला 45 टक्के मते मिळू शकतात. तर भाजपला 44 टक्के मते मिळू शकतात. याशिवाय इतरांना 11 टक्के मते मिळू शकतात. राज्यात भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे.

तेलंगणात चुरशीची लढत होणार का?
ओपिनियन पोलनुसार तेलंगणातील 119 जागांपैकी काँग्रेसला 48 ते 60 जागा मिळू शकतात. तर मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीला (BRS) 43 ते 55 जागा मिळू शकतात. भाजपला 5 ते 11 जागा मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय इतर पक्षांनाही 5 ते 11 जागा मिळू शकतात.

Caste Census : काँग्रेसची मोठी घोषणा; काँग्रेस शासित सर्व राज्यांमध्ये होणार जातनिहाय जनगणना

काँग्रेसला 39 टक्के मते मिळू शकतात. तर बीआरएसला 38 टक्के आणि भाजपला 16 टक्के मते मिळू शकतात. तर 7 टक्के मते इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. राज्यात बीआरएस सरकार आहे. बहुमतासाठी पक्षाला 60 जागा लागतील.

मिझोराममध्ये सत्ता कोण घेणार?
मिझोराममध्ये कोणालाही बहुमत मिळताना दिसत नाही. मिझो नॅशनल फ्रंटला (एमएनएफ) 13 ते 17 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 10 ते 14 जागा मिळू शकतात. झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) 9 ते 13 जागा जिंकू शकते. याशिवाय 1 ते 3 इतर जागा जिंकता येतील.

एमएनएफला राज्यात 31 टक्के मते मिळू शकतात. काँग्रेसला 28 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. तर झेडपीएमला 27 टक्के आणि इतरांना 14 टक्के मते मिळू शकतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube