Caste Census : काँग्रेसची मोठी घोषणा; काँग्रेस शासित सर्व राज्यांमध्ये होणार जातनिहाय जनगणना

  • Written By: Published:
Caste Census : काँग्रेसची मोठी घोषणा; काँग्रेस शासित सर्व राज्यांमध्ये होणार जातनिहाय जनगणना

नवी दिल्ली : नुकतीच बिहारमध्ये करण्यात आलेल्या जातिनिहाय जनगणनेची (Caste Census) आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता काँग्रेस (Congress) पक्षाकडून आगामी लोकसभेपूर्वी (Loksabha Election) मोठी घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस शासित सर्व राज्यांमध्ये जातिनिहाय जनगणना केली जाणार आहे, अशी माहिती खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिली आहे. ते काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस जाती-धर्मासाठी काम करत नसून गरिबांसाठी काम करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. (Rahul Gandhi On Cast Census)

बैठकीत जात जनगणनेवर चर्चा झाली आणि सर्वांनी त्याला पाठिंबा दिल्याचे राहुल यांनी यावेळी सांगितले. त्यानुसार छत्तीसगड, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यांमध्ये जात आधारित जनगणना करतील. भाजपवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी देशात जो द्वेष पसरवला आहे. जातीनिहाय जनगणनेबाबत भाजपवर दबाव आणून कामे मार्गी लावू असा इशारा यावेळी राहुल गांधींनी दिला.

रोहित पवारांच्या संघर्षाचं बिगुल वाजलं; दसऱ्याला शरद पवारांच्या सभेने यात्रेची सुरुवात

आर्थिक सर्वेक्षणही करणार : राहुल

सध्या दोन भारत निर्माण होत आहेत. एक अदानीचा आहे तर, दुसरा सर्वांचा आहे. अशा परिस्थितीत जातीय जनगणना आवश्यक आहे. यामुळे विकासाचा नवा पॅरामीटर उघडेल. जाती जनगणनेनंतर आर्थिक सर्वेक्षणही करून कोणाकडे किती मालमत्ता आहे, कुठे आहे, याची माहिती घेतली जाईल.

राज्यात ‘टोल’ घोटाळा; राज ठाकरेंच्या गंभीर आरोपांवर फडणवीसांच्या कार्यालयाचे स्पष्टीकरण

यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी जात जनगणना करण्यास असमर्थ आहेत. आमचे चारपैकी तीन मुख्यमंत्री ओबीसी प्रवर्गातील आहेत आणि भाजपच्या 10 मुख्यमंत्र्यांपैकी फक्त एकच मुख्यमंत्री ओबीसी प्रवर्गातील आहे. पंतप्रधान ओबीसींसाठी काम करत नसल्याचे राहुल गांधी म्हणाले.

बिहारची आकडेवारी नेमकी काय?

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकराने केलेल्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली होती. यात नितीश सरकारने एकूण 215 जातींची आकडेवारी जाहीर केली होती. या आकडेवारीनुसार बिहारमधील जातनिहाय लोकसंख्या मुस्लिम- 17.70 टक्के, यादव- 14. 26 टक्के, कुर्मी – 2.87 टक्के, कुशवाह- 4.21 टक्के, ब्राह्मण- 3.65 टक्के, भूमिहार- 2.86 टक्के, राजपूत- 3.45 टक्के, मुशार- 3.08 टक्के, मल्लाह- 2.60 टक्के, व्यापारी –2.31 टक्के, कायस्थ – 0.60 टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube