Assembly Elections : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले; 3 डिसेंबरला येणार निकाल

  • Written By: Published:
Assembly Elections : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले; 3 डिसेंबरला येणार निकाल

नवी दिल्ली :  देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, मिझोरम आणि मध्य प्रदेशमध्ये 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर तर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 17 नोव्हेंबर रोजी पडणार आहे. तर, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर आणि तेलंगणा मध्ये 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, 3 डिसेंबर रोजी सर्व राज्यांच्या मतदानाचा निकाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी दिली. (Chhattisgarh, Madhya Pradesh, Mizoram, Rajasthan & Telangana Assembly Election Dates Announced )

मिझोरम विधानसभेचा कार्यकाळ 23 डिसेंबर रोजी संपणार असून, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थानच्या विधानसभेचा कार्यकाळ 16 जानेवारी 2024 रोजी संपणार आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान आणि मिझोराममध्ये एकूण 1.77 लाख मतदान केंद्रे असतील, त्यापैकी 1.01 लाख केंद्रांवर वेबकास्टिंग सुविधा असेल. मध्य प्रदेशातील आदिवासींसाठी राखीव असलेल्या वनक्षेत्रात मतदान केंद्रे उभारली जाणार असल्याचे राजीव कुमार यांनी यावेळी सांगितले.

”…मग समोर बसलेले शरद पवार काय मेणाचा पुतळा होते का?”

पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या 679 जागा आणि 16.14 कोटी मतदार आहेत. यामध्ये 8.2 कोटी पुरुष मतदार, 7.8 कोटी महिला मतदार असून, 60.2 लाख मतदार हे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. PWD मतदार 17.34 लाख, वय वर्षे 80 च्या पुढील मतदारांची संख्या 24.7 लाख असून, या सर्वांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा असेल असेही यावेळी सांगण्यात आले आहे. पाच राज्यांमध्ये महिला मतदरांच्या संख्येत वाढ झाली असून, मध्यप्रदेश 5.6 कोटी, राजस्थान 5.25, तेलंगणा 3.17, छत्तीसगढ़ 2.03 कोटी तर, मिजोरम 8.52 लाख मतदार असल्याचे आयोगाकडून यावेळी सांगण्यात आले.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2023 कार्यक्रम

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 21 ऑक्टोबर 2023
नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस 30 ऑक्टोबर 2023
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 2 नोव्हेंबर 2023
मतदानाची तारीख 17 नोव्हेंबर 2023
विधानसभा निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबर 2023

राजस्थान विधानसभा निवडणूक 2023 कार्यक्रम

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 30 नोव्हेंबर 2023
नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस 6 नोव्हेंबर 2023
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 9 नोव्हेंबर 2023
मतदानाची तारीख 23 नोव्हेंबर 2023
विधानसभा निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबर 2023

Raj Thackeray : ..तर आम्ही टोलनाकेच जाळून टाकू! राज ठाकरेंचा सरकारला रोखठोक इशारा

छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2023 कार्यक्रम
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 13 ऑक्टोबर (पहिला टप्पा)
नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस 20 ऑक्टोबर 2023 (पहिला टप्पा)
नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस 23 ऑक्टोबर 2023 (पहिला टप्पा)
मतदान तारीख ०७ नोव्हेंबर २०२३ (पहिला टप्पा)
निवडणूक निकाल 03 डिसेंबर 2023

मिझोराम विधानसभा निवडणूक 2023 कार्यक्रम
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 13 ऑक्टोबर 2023
नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस 20 ऑक्टोबर 2023
नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस 23 ऑक्टोबर 2023
मतदानाची तारीख 07 नोव्हेंबर 2023
विधानसभा निवडणुकीचे निकाल 03 डिसेंबर 2023

Dhananjay Munde : ‘फेटा बांधणार नाही, हार-तुरेही घेणार नाही’; मुंडेंच्या निर्धाराचं कारण काय?

तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023 कार्यक्रम

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 3 नोव्हेंबर 2023
नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस 10 नोव्हेंबर 2023
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 15 नोव्हेंबर 2023
मतदानाची तारीख 30 नोव्हेंबर 2023
विधानसभा निवडणुकीचे निकाल 03 डिसेंबर 2023

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube