Dhananjay Munde : ‘फेटा बांधणार नाही, हार-तुरेही घेणार नाही’; मुंडेंच्या निर्धाराचं कारण काय?

Dhananjay Munde : ‘फेटा बांधणार नाही, हार-तुरेही घेणार नाही’; मुंडेंच्या निर्धाराचं कारण काय?

Dhananjay Munde : जोपर्यंत शेतकऱ्यांना पिकविमा आणि अतिवृष्टीचे अनुदान मिळणार नाही, तोपर्यंत मी हार तुरे आणि फेटे बांधून घेणार नाही, असा निर्धार राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी व्यक्त केला. धनंजय मुंडे परळी तालुक्यातील सिरसाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी कृतज्ञता सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना कृषी विभागाच्या योजनांबाबत माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांसाठी सरकारकडून काय केलं जात आहे, याचीही माहिती दिली.

मुंडे म्हणाले, दिवाळीच्या आत कितीही संकटे आली तरी मी अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देणार. सोयाबीनचे उपकेंद्र परळी तालु्क्यात आणलं अन् लातूरच्या लोकांनी माझ्या पोस्टरला चपलांचा हार घातला. पण, तु्म्ही या घटनेचा साधा निषेधही केला नाही. माझी आई खूप आजारी आहे म्हणून लातूरहून विमानान मुंबईला घेऊन जात असताना तिथल्या लोकांनी आम्हाला काळे झेंडे दाखवले, अशी खंत मुंडे यांनी बोलून दाखवली.

Maratha Reservation : ‘आमच्यावर लाठीहल्ला का केला?’ नाशकातून जरांगेंचा सरकारला थेट सवाल

यानंत मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. मराठा आरक्षणासाठी 1998 पासून मी लढा दिला. बीड जिल्हा परिदेत 2007 मध्ये पहिल्यांदा मराठा आरक्षणासाठी ठराव केला तसेच विधिमंडळातही मराठी आरक्षणाची मीच सर्वाधिक वेळा केली असेही मुंडे म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देताना ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावं तसेच संविधानानुसार आरक्षण असावं, ही सरकारची जबाबदारी आहे. मुस्लीम, धनगर समाजासाठीही आरक्षण मिळावं हीच माझी भूमिका आहे, असेही मुंडे म्हणाले. आगामी काळात राज्यात ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे त्याला आपण बळी पडता कामा नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube