Download App

Manoj Jarange तुम्ही अजून लहान, जरा अभ्यास करा; राणेंचा अक्कल काढत खोचक सल्ला

Narayan Rane On Manoj Jaragne Patil : मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) अजून लहान आहेत, त्यांनी जरा आणखीन अभ्यास करा, या शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी खोचक सल्ला दिला आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाची धग कायम असल्याचं दिसून येतंय. ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे लावून धरत आहे. त्यावर बोलताना नारायण राणे यांनी एका अर्थाने जरांगेंची अक्कलच काढली आहे. त्यामुळे आता मराठा बांधव आणि नारायण राणे यांच्यात वादंग पेटणार असल्याची शक्यता आहे.

Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपीच्या मलेशिया दौऱ्यानंतर ‘यूके टूर’ नं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

नारायण राणे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण हवं की नाही हे मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला विचारावं. कोणताही मराठा बांधव ओबीसीतून आरक्षण घेणार नाही. आरक्षण कसं दिलं जात, आरक्षणाबाबत राज्यघटनेत काय तरतुदी आहेत, हे जरांगेंनी जाणून घ्याव्यात, तुम्ही अजून लहान आहेत, जरा अभ्यास करा, असं नारायण राणे म्हणाले आहेत. मराठा आरक्षणावर नारायण राणे बोलताना माध्यमांकडून विचारण्यात आलेल्या सवालावर राणए चांगलेच भडकल्याचे दिसून आले आहेत. कोण जरांगे पाटील? मला माहीत नाही, मी ओळखतंही नाही. तुम्ही त्याचं नाव सतत घेता? घटनेच्या कोणत्या कलमानूसार मराठा आरक्षण दिलं जाव, हे मनोज जरांगे पाटलांना विचारा, असंही खोचक विधान नारायण राणे यांनी केलं आहे.

शरद पवारांच्या पुस्तकाचा दाखला देऊन CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं!

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वादंग पेटलेलं असताना दुसरीकडे ओबीसी समाजाकडूनही कंबर कसण्यात आली आहे. जालन्यात ओबीसी मेळावा घेत मंत्री छगन भुजबळांनी मराठा बांधवांवर जोरदार प्रहार केल्याचं पाहायला मिळालं आहे. एवढंच नाहीतर मनोज जरांगे यांच्या हल्लाबोल चढवला आहे. त्यामुळे आता राज्यात मराठा-ओबीसी समाजबांधव एकमेकांसमोर उभे ठाकल्याची परिस्थिती दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवरही नारायण राणे यांनी परखडपणे भाष्य केलं आहे. कोणत्याही नेत्याने दोन समाजात झुंज लावण्याचा प्रयत्न करू नये, असं नारायणे राणेंनी स्पष्ट केलं आहे.

आंबेडकरांना अटक करा :
राज्यात 3 डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता असून, सगळ्या स्थानिक पोलीस स्टेशन्सला अलर्ट राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सहा डिसेंबरनंतर काहीही होऊ शकते अशा सूचनाही पोलिसांना आहेत, असे दोन मोठे दावे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी 28 नोव्हेंबर रोजी पुण्यात केला होता. त्यानंतर आता राणेंनी थेट आंबेडकरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी असे म्हणच दंड थोपटले आहेत. राणेंच्या या मागणीवरून आता भाजप आणि वंचितमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, प्रकाश आंबेडकर यावर नेमकं काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us