नरहरी झिरवळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ…ट्रान्सजेंडरच्या भावावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ट्रान्सजेंडरच्या भावाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.

narhari zirwal

narhari zirwal

Minister Narhari Zirwal Viral Video : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ (minister Narhari Zirwal Viral Video) यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी कफ परेड पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलायं. काही दिवसांपूर्वी मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी ट्रान्सजेंडरच्या भावाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं. मला नोकरीला लाव अन्यथा व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी ट्रान्सजेंडरच्या भावाकडून दिली असल्याचा आरोपही एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

झिरवळ एका तृतीयपंथीय व्यक्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले आहे. झिरवळ आणि तृतीयपंथीय व्यक्तीने शासकीय निवासस्थानी पार्टी केल्याचे व्हिडिओतून दिसून येत आहे. त्यामुळे झिरवळ यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होऊ लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून झिरवळांवर कारवाई होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.

मासिक पाळीच्या असह्य वेदनांपासून सुटका हवी? ‘हे’ घरगुती उपाय करून बघा!

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कथित व्हिडिओने समाज माध्यमांवर उलट-सुलट चर्चा आहे. एका ट्रान्सवुमनसोबत त्यांचे चित्रिकरण करण्यात आल्याचं दिसते. पवन यादवचा भाऊ रवी यादव यानेच हे प्रकरण समोर आणल्याने राष्ट्रवादी पक्ष पुन्हा अडचणीत सापडला.

झिरवळ यांच्या कथित व्हिडिओप्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. नरहरी झिरवळ यांनी मला फोनवरून माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितलं आहे की, हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार केलेला व्हिडिओ आहे. याची चौकशी व्हायला पाहिजे. मी त्यांना सल्ला दिला की तुम्ही तात्काळ तक्रार दाखल करा. या व्हिडिओची शहानिशा करण्यात येईल. त्याची सत्यता पाहण्यात येईल. त्यानंतर झिरवळ यांच्या राजीनाम्याबाबत त्यांच्या पक्षाच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मी योग्य निर्णय घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

Exit mobile version