Nitesh Rane On Harshvardhan Sapkal : तुझी जीभ जास्तच वळवळत असेल तर हातात काढून देऊ, या शब्दांत मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan sapkal) यांना खुलेआम धमकीच दिलीयं. कांद्याच्या आंदोलनादरम्यान सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी शब्दांत सडकून टीका केली. या टीकेनंतर मंत्री नितेश राणे यांनी सपकाळ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
‘डॉन 3’ च्या वादानंतर रणवीर सिंगवर FWICE ची बंदी! 45 कोटींच्या नुकसानभरपाईचीही केली मागणी
पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, कांद्यासंदर्भातील आंदोलनादरम्यान बोलताना कॉंग्रेसचा टिंपाट, झाकनझुल्या हर्षवर्धन सपकाळ याच्या जीभेला हाड नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याच्या मुख्यममंत्र्यांबद्दल बोलताना त्याची जीभ जास्तच वळवळली. मुद्दा होता कांद्याचा आणि मी काहीतरी करतोयं हे दाखवण्यासाठी हा टिंपाट, त्याची निवडून येण्याची लायकी नाही तो मोदी, फडणवीसांबद्दल एकेरी बोलत असेल तर त्याला महाराष्ट्रात त्याला फिरुन द्यायचं का नाही याचा विचार करावा लागेल. कांद्याच्या नावाने तुझी जीभ जास्तच वळवळली तर ती जीभ हातात काढून देण्याची ताकद भाजपमध्ये असल्याची धमकीच नितेश राणे यांनी सपकाळ यांना दिलीयं.
तसेच कॉंग्रेसची हीच संस्कृती आहे का? जी सांगितली जा,ते राहुल गांधींनी हेच शिकवलं का? स्वत:च्या जिल्ह्यात तुझी लायकी काय हे चांगलंच माहिती . याची नोंद आम्ही सर्वांनी घेतलीयं. आता हर्षवर्धन सपकाळने फिरताना आजूबाजूला बघून काळजी घ्यावी, असाही इशारा नितेश राणे यांनी सपकाळ यांना दिला आहे.
Onion Price : शेतकऱ्यांना दिलासा; आजपासून 1580 रूपये प्रति क्विंटल दराने होणार कांदा खरेदी
काय म्हणाले होते हर्षवर्धन सपकाळ?
“मोदी कांदाXXX आहे. आजपर्यंत नमकXXX ऐकले होते. मोदी म्हणाला कांदा खाल्लेला आहे. कांद्याच्या मोदी, फडणवीस जबाबदार आहेत . फडणवीस विदर्भाचे झाले नाहीत, तो आपला काय होणार? XXXX जोपर्यंत पंतप्रधान पदाच्या खुर्चीत आहे, तोपर्यंत काही होणार नाही. हा भांडकुदळ आजूबाजूच्या देशांशी भांडण करतो. अरे मोदी XXX… हा पंतप्रधान घाबरलेला आहे, डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. याने काहीतरी काळेबेरे केले असेल, त्यामुळे अमेरिकेचे ऐकतो, या शब्दांत सपकाळ यांनी टीका केली होती.
आता व्हॉट्सअपवर नंबरने नाही तर, युझरनेमने होणार चॅटिंग; जाणून घ्या, कसं करायचं User Name सेट?
दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांत आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आलायं. या आंदोलनातून काँग्रेस नेत्यांकडून मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीकेवर नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आता काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
