आता व्हॉट्सअपवर नंबरने नाही तर, युझरनेमने होणार चॅटिंग; जाणून घ्या, कसं करायचं User Name सेट?

WhatsApp Username Feature व्हॉट्सॲपवर आता तुमची ओळख बदलणार! मोबाईल नंबरऐवजी 'युझरनेम' शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध होणार..

  • Written By: Published:
आता व्हॉट्सअपवर नंबरने नाही तर, युझरनेमने होणार चॅटिंग; जाणून घ्या, कसं करायचं User Name सेट?

WhatsApp Brings New Username Feature : जगभरात कोट्यवधी लोकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या ‘व्हॉट्सॲप’ ने अखेर युझर्सची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली आहे. आता व्हॉट्सॲपवर कोणाशीही कनेक्ट होण्यासाठी किंवा चॅट करण्यासाठी तुम्हाला तुमचा वैयक्तिक मोबाईल नंबर देण्याची गरज भासणार नाही. टेलिग्राम आणि इंस्टाग्रामप्रमाणेच आता व्हॉट्सॲपवरही ‘युझरनेम’ हे फीचर येत आहे. हे फीचर कसं काम करणार आणि यूजरनेम कसं सेट करायचं त्याबद्दल जाणून घेऊया…

कटिंग करताना हजामच्या खुर्चीवर बसताच तुम्हालाही सुटतेय का पेंग?; मग ही बातमी एकदा वाचाच…

कसं काम करणार व्हॉट्सॲपचं ‘युझरनेम’ फीचर?

सध्या या फीचरची बीटा व्हर्जनवर (अँड्रॉइड आणि आयफोन) चाचणी सुरू असून, लवकरच हे फीचर सर्वसामान्य युझर्ससाठी रोलआऊट केले जाणार आहे. यात प्रत्येक युझरला आपलं एक युनिक युझरनेम तयार करता येईल. जेव्हा एखादी नवीन व्यक्ती तुमच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधेल, तेव्हा तिला फक्त तुमचं ‘युझरनेम’ दिसेल, तुमचा मोबाईल नंबर नाही. या अपडेटचा सर्वात मोठा फायदा प्रायव्हसी (गोपनीयता) आणि सुरक्षेसाठी होणार आहे.

मोबाईल नंबरचं काय होणार?

अकाऊंट लॉग-इन करण्यासाठी, अकाऊंट रिकव्हरीसाठी आणि सुरक्षेसाठी तुमचा नंबर बॅकएंडला लिंकच राहील. तो फक्त अनोळखी लोकांपासून सुरक्षित ठेवला जाईल. जर तुम्हाला युझरनेम वापरायचं नसेल, तर तुम्ही जुन्या पद्धतीनुसार नंबर शेअर करूनही व्हॉट्सॲप वापरू शकता. तसेच, तुम्ही तुमचं युझरनेम कधीही बदलू शकता, ज्याचा तुमच्या जुन्या चॅट्सवर काहीही परिणाम होणार नाही.

WhatsAap चॅटींग करताना जहिरात पाहा नाही तर पैसे भरा; कंपनीने सांगितला प्लॅन

‘युझरनेम’ कसं सेट करायचं? स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध झाल्यानंतर खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही नंबर लपवू शकता.

– व्हॉट्सॲपच्या Settings मध्ये जा.
– तुमच्या Profile (फोटो) वर टॅप करा.
– येथे Username चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
– तुमचं आवडतं नाव टाईप करा. व्हॉट्सॲप ते नाव उपलब्ध (Available) आहे की नाही ते चेक करेल.
– नाव उपलब्ध असल्यास Save करा. झालं तुमचं युझरनेम तयार.

आता टेन्शन खल्लास! मुलांच्या WhatsApp वर पालकांचा वॉच! नव कंट्रोल फीचर कसं सुरू कराल?

युझरनेमसाठी पाळावे लागणार काही नियम

व्हॉट्सअपवर युझरनेमसाठी काही नियम पाळावे लागणार आहेत. त्यानुसार यूजरनेम किमान 3 ते कमाल 35 अक्षरांचे असावे. त्यात फक्त अक्षरे, अंक, डॉट (.) आणि अंडरस्कोअर (_) वापरता येईल. सुरुवातीला ‘www’ लावता येणार नाही, तसेच शेवटी ‘.com’ किंवा ‘.org’ लिहिता येणार नाही. स्पॅम आणि फेक प्रोफाईल्स रोखण्यासाठी हे नियम बनवले आहेत. व्हॉट्सॲपने अलीकडेच चॅट लॉक, सिक्रेट कोड, स्क्रीनशॉट ब्लॉकिंग आणि प्रायव्हसी चेकअप सारखे भन्नाट फीचर्स आणले आहेत. पण ‘युझरनेम’ चा हा बदल आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि गेम-चेंजर ठरणार आहे.

follow us