Download App

‘मुलभूत अन् अर्थिक धोरणांमुळेच विकासाला गती’; गडकरींनी सांगितला विकासाचा फॉर्मूला

Nitin Gadakri News : सरकारच्या मुलभूत अन् अर्थिक धोरणांमुळेच विकासाला गती मिळाली असल्याचं सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) यांनी मोदी सरकारच्या विकासाचा फॉर्मूला सांगितला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी नितीन गडकरींनी अनेक गोष्टींवर मनमोकळेपणे भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधला फरकही कळत नाही; आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

नितीन गडकरी म्हणाले, काँग्रेसच्या धोरणामुळे देशाचा विकास होऊ शकला नाही, पण पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी तळागाळातल्या माणसाला परमेश्वर मानून त्याची सेवा करण्याचं धोरण देशात आखलं. आज देशात अॅग्रीकल्चरचा विकास 12 टक्के, निर्मीतीमध्ये 22 ते 24 टक्के, सर्व्हिस सेक्टर 54 टक्के आहे. महात्मा गांधी म्हणायचे, देश गावात राहतो, पण आजची परिस्थिती तशी नाही, गावं ओस पडत गेले असल्याचं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

Ahmednagar Politics : नगरच्या विकासासाठी काय केलं? आ. जगतापांनी विरोधकांना सुनावत यादीच दिली

तसेच मुंबई, बेंगलोर, पुणे, चैन्नई, इथंल विकास दिसतोयं, त्याचा संबंध अर्थिक धोरणांशी असून आज गावात शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही. रोजगार, रस्ते अशा अनेक समस्या आहेत. रोजगारासाठी लोकं शहरात आली. मी जेव्हा मुंबईत उड्डाणपुल बांधले तेव्हा आर. आर पाटील आणि जयंत पाटील यांनी प्रश्न विचारला होता, तुम्ही जर रस्ते बीओटीवर बांधता तर सरकार का बीओटीवर चालवायला देत नाहीत. आज विकास दर वाढलां आहे. जीएसटी आता 2 लाख कोटींवर गेला असून आयकर वाढला असल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं आहे.

LPG Price : गुडन्यूज! नववर्षाआधीच LPG गॅसच्या दरात मोठ्ठी कपात; व्यावसायिकांना दिलासा

तसेच सरकारला मिळणाऱ्या पैशांमधून लोकांच्या उपयोगी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पिण्याच्या पाण्याची योजना, ग्रामसडक योजना, सिंचन सुविधा अनेक गोष्टींचं बजेट वाढलं आहे. गरीबाला केंद्रबिंदू मानून जीवन सुसह्य करण्यासाठी अर्थिक नीतीप्रमाणे प्रयत्न करणं तसेच भारताला महाशक्ती करायचं असेल तर विकास दर वाढवावा लागणार आहे. त्याचप्रमाणे श्रीमंत गरीबांमधील अंतर कमी करावं लागणार असल्याचंही गडकरींनी सांगितलं आहे.

बदलत्या धोरणांत एवढी गती मिळाली की मला अनेकदा लोकं भेटून अनुभव सांगत असतात. त्यातील एक तरुण भेटला. तो म्हणाला तुम्ही द्वारका एक्सप्रेस हायवे बांधला. हा हायवे 536 किमीचा आहे. या हायवेमुळे त्याच्या बाजूला 5 लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. तिथले बंद पडलेली कामे पुन्हा सुरु झाली. देहरादूनमध्येही रस्त्यामुळे जमिनींचे दर तीन पटीने वाढल्याचं अनेक लोकं मला सांगत असल्याचं गडकरींनी मुलाखतीत सांगितलं आहे.

Tags

follow us