Vijay Wadettiwar On Sanjay Rathod : बेलापूर येथील शाळकरी मुलीवर अत्याचार, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी घेरले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विरोधक आरोप करत आहेत. आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी नवीन प्रकरण उकरून काढले आहे. मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचशे रुपये किंमतीचा भूखंड हा अवघ्या एक रुपये चौरस मीटरने दिला असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
पैसे तयार ठेवा, सप्टेंबरमध्ये बाजारात येत आहे ‘ह्या’ शानदार बाइक्स; पहा संपूर्ण लिस्ट
1 नोव्हेंबर 2023 रोजी राज्याच्या नगरविकास विभागाने एक भूखंड श्री.संत डॉ.रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्टला हस्तांतरित करण्यात आल्याचा उल्लेख करणारा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. नवी मुंबईतील बेलापूर येथील हा भूखंड आहे. मात्र मंत्रिमंडळाची कोणतीही मान्यता न घेता हा निर्णय झाल्याचे आता समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांचे लाडके मित्र मंत्री संजय राठोड यांच्या दबावात बेलापूर नवी मुंबई येथील 5600 चौरस मीटर भूखंड श्री.संत डॉ. रामराव महाराज चॅरिटेबल या ट्रस्टच्या नावाने वाटप करण्यात आला आहे. राठोड यांनी एका धार्मिक ट्रस्टसाठी ही जागा मागितली होती. परंतु नंतर ही जागा स्वतःच्या ट्रस्टच्या नावावर गेल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
‘पैलवान कुस्ती खेळतात खेळू द्या’, आव्हाडांचा अजित पवारांसह सावंतांना टोला
मतांसाठी लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये आणि लाडक्या मंत्र्याला पाचशे कोटींचा भूखंड कवडीमोल भावात. महाराष्ट्राची लूट जिथे मिळेल तिथे कशी सुरू आहे हे बघा. मुख्यमंत्र्यांचा ‘लाडका मंत्री‘ असतो तेव्हा काय काय होऊ शकते बघा, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तब्बल पाचशे कोटी रुपयांचा भूखंड अवघ्या एक रुपये प्रती चौरस मीटरच्या किंमतीत मिळू शकतो. दुसऱ्यांच्या जमिनी फुकटात हडपू शकतात.
मुख्यमंत्र्यांच्या “लाडका मंत्री” योजनेचा आणखी एक लाभार्थी महाराष्ट्रापुढे आला आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय.
अडीच हजार कोटींचे बजेट असताना आठ हजार कोटींचे टेंडर
जलसंधारण विभागासाठी तरतूद अडीच हजार कोटींची आहे. परंतु मंत्री संजय राठोड यांनी तब्बल आठ हजार कोटींचे टेंडर काढले असल्याचा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
#Live : पत्रकार परिषद, नागपूर https://t.co/VickF1o8RZ
— Office Of Vijay Wadettiwar (@OfficeOfVW) August 31, 2024