Download App

मेंढ्याच्या कळपातून वाघांच्या कळपात या; शिरसाटांची भास्कर जाधवांना खुली ऑफर

भास्करराव तुम्ही मेंढ्याच्या कळपातून वाघांच्या कळपात या, अशा शब्दांत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांना ऑफर दिलीयं.

Minister Sanjay Shirsath : मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत असल्याची चित्र दिसून येत आहे. ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्यानंतर कोकणातील अनेक शिंदे गटात सामिल होत आहेत. अशातच आता ठाकरे गटाची बुलंद तोफ आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावर बोलताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जाधवांना खुली ऑफरच दिलीयं. भास्करराव तुम्ही मेंढ्याच्या कळपातून वाघांच्या कळपात या, अशी ऑफर शिरसाटांनी दिलीयं.

धसांनी ‘लेटर बॉम्ब’ टाकत मुंडेंविरोधात उघडली नवी आघाडी; थेट मागितली महत्त्वाची माहिती

पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, भास्कर जाधव यांची आता मानसिकता झालीयं. ठाकरे गटातील नेत्यांसोबत काम करण्याची त्यांची इच्छा नाही, हे अनेकदा भास्कर जाधव यांनी सुचवलंय. आता त्यांची विवनवणी काही लोकं करत आहेत, थोडा वेळ लागत आहे, पण मी खात्रीने सांगतो, पुढील अधिवेशनापर्यंत अनेक बदल झालेले दिसतील. जाधव माझे मित्र आहेत त्यांच्याशी मी कधीही बोलू शकतो . भास्करराव या मेंढ्याच्या कळपात राहण्यापेक्षा वाघाच्या कळपात या, असं शिरसाट म्हणाले आहेत.

लाडक्या बहिणींंनंतर आता लाडक्या भावांचीही पडताळणी; शासकीयऐवजी खासगी उद्योगांमध्येच प्रशिक्षण

तसेच शिंदे गट भाजपवात विलीन होणार दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावरुनही शिरसाट यांनी राऊतांना खोचक प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत यांना काल रात्री जास्त झाली होती. रात्रीचं हॅंगओव्हर अजून उतरलेलं दिसून नाही. त्यामुळेच ते अशी बडबड करीत असल्याची टीका संजय शिरसाट यांनी केलीयं. आत्ता २०२४ चालू असून २०२९ मध्ये उबाठा कुठे असेल त्यावर संजय राऊतांनी भाष्य करावं महापालिका निवडणुकीनंतर उबाठा कुठे असेल हे शोधूनही सापडणार नाही, असंही शिरसाट म्हणाले आहेत.

सुरेश धसांनी मंत्री धनंजय मुंडेवर आरोप का केले? कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून मोठा गौप्यस्फोट, मांडवली…

तो अजितदादांचा अधिकार…

संतोष देशमुख हत्या आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागलीयं. अजितदादा हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख आहेत, कोणाचा राजीनामा घ्यायचा, कोणाचा नाही हे सर्वस्वी अधिकार दादांना आहेत. प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची भूमिका घेतली पाहिजे, पक्षाची ही अंतर्गत बाब त्यामुळे आम्ही त्यावर बोलू शकत नाही, असंही शिरसाट म्हणाले आहेत.

follow us