Download App

Adway Hire : ‘मंत्र्यांचं डिपॅाझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही’

  • Written By: Last Updated:

नाशिक : शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पहिल्यांदाच राज्याचा दौरा करणार आहेत. राज्याच्या बहुतांश भागात उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. नुकतीच कोकणातील खेड येथील सभा पार पडल्यानंतर आता त्यांची दुसरी सभा ही उत्तर महाराष्ट्रात होणार आहे. त्यासाठी मालेगाव हे शहर निवडण्यात आले आहे. त्या सभेची पूर्ण तयारी अद्वय हिरे हे करीत आहे. काल या सभेची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Adway Hire) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला.

 

अद्वय हिरे म्हणाले की, मला विचारल्या जातं की, स्थानिक मंत्र्याला पाडण्यासाठी उद्धव ठाकरे ही सभा घेत आहेत का? तर मला सांगावस वाटतं की, उद्धव ठाकरे हे कुणाला पाडण्यासाठी तर जनतेला संबोधित करायला येत आहेत. कुठल्या तरी आमदार-मंत्र्याला पाडायला उद्धव ठाकरेंना येण्याची गरज नाही. मी अपक्ष असतो तरी ह्या मंत्र्यांना पाडलं असतं. आता मीच या मंत्र्याला पाडून दाखवेल. शिवाय त्यांचं डिॉझीटही जप्त करून दाखवेल, अशा शब्दात अद्वय हिरे यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर टीका केली. मालेगावमधील मसगा कॉलेजच्या मैदानावर उध्दव ठाकरेंची सभा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी या सभेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी हिरे बोलत होते.

मोठी बातमी : शेतकऱ्यांचा लाँग मार्च अखेर स्थगित; गावित यांची घोषणा

ते म्हणाले, आदित्य ठाकरेंना नाशिक जिल्ह्यातून खासदार करू. त्यासाठी आदित्य ठाकरेंनी या फक्त नाशिक जिल्ह्यातून लोकसभेला उभं राहावं. त्यांना आम्ही शिवसैनिक  खासदार केल्याशिवाय राहणार नाही. आगामी लोकसभा निवडणूकीत किमान 40 जागा महाविकास आघाडीच्या निवडूण आणायच्या आहेत.

शिवसेनेतील बंडाळीनंतर शिवसेना संपली असं अनेकांना वाटायला लागलं. मात्र, शिवसेना (ठाकरे गट) मागे आली, ती झेप घेण्यासाठी. शिवसेना राज्यातला नंबर एकचा पक्ष होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व महाविकास आघाडीतील सगळे नेते मान्य करत आहेत.

खरंतर मी आधीच शिवसेनेत यायला हवं होतं. मात्र, गुजरातच एक विकास पुरूष अचानक चर्चेत आला. आणि आम्हाला वाटल की, या विकासपुरुषाने जसा गुजरातचा विकास केला, तसा महाराष्ट्राचाही विकास करेल. म्हणून आम्ही त्या पुरुषांसोबत गेलो. मात्र, त्यांनी देशाचं वाटोळं केलं, अशा शब्दात पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं.

यावेळी त्यांनी शिंदे गटाचाही समाचार घेतला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेच्या मैदानावर पालकमंत्र्यांना नवीन कलेक्टर कचेरी बांधायची आहे. मात्र, भाऊराव पाटलांच्या आशिर्वादामुळेच आज असंख्य गावखेड्यातील मुलं धोतरातून पॅन्टमधे आली. शिकून सवरून मोठी झाली. आणि आज त्याच संस्थेची जागा बळकावण्याचा प्रयत्न होतो आहे. नाशिकच्या पालकमंत्र्याची पोरं इतर शिक्षण संस्थेत पास होत नव्हती, त्या मुलांना याच शिक्षण संस्थेनं पास केली, असा टोलाही त्यांनी दादा भुसे यांना लगावला.

Tags

follow us