मोठी बातमी : शेतकऱ्यांचा लाँग मार्च अखेर स्थगित; गावित यांची घोषणा

  • Written By: Published:
मोठी बातमी : शेतकऱ्यांचा लाँग मार्च अखेर स्थगित; गावित यांची घोषणा

Farmer Long March Widrawl :   चार दिवसांपासून सुरू असलेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च अखेर  स्थगित करण्यात आला आहे, अशी घोषणा शेतकऱ्यांचे नेते गावित  यांनी केली आहे. याबाबत टिव्ही9 वृत्तवाहिनीने वृत्त प्रकाशित केले आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्याने हा लाँंग मार्च मागे घेत असल्याचे गावित यांनी म्हटले आहे. यावेळी गावित यांनी शेतकऱ्यांचा मागण्या मान्य केल्याबद्दल आभार मानले. यावेळी गावित म्हणाले की, सरकारच्या निवेदनाची प्रत मोर्चेकऱ्यांना वाचून दाखवली जाणार आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सरकारच्या निवेदनाची प्रत दिल्याचेही यावेळी गावित यांनी सांगितले.

‘मविआ’तील सगळेच पक्ष अनिल जयसिंघानी फिरला, त्यामुळे.. एकनाथ शिंदेंनी दिला इशारा

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल कांद्याला देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची घोषणा केली आहे. आता देण्यात येणाऱ्या 300 रुपयांच्या अनुदानाऐवजी आता शेतकऱ्यांना कांद्यासाठी 350 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत घोषणा केली आहे. याबाबत शिंदेंकडून विधानसभेत निवेदनही देण्यात आले आहे.

बावनकुळेंनी बॉम्ब फोडला : भाजप 240 तर शिवसेनेला फक्त 48 जागा देणार…

गेल्या सात दिवसांपासून शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरू होते.  मागण्या मान्य करण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून लाखो शेतकरी मुंबईच्या दिशेने निघाले होते. शेतकऱ्यांचा या मोर्चात राज्यभरातील पुरूष तसेच महिला शेतकरी सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनादरम्यान काल एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबियांना राज्य सरकराकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सरकारने याआधीच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर, शेतकऱ्याचा जीव वाचला असता अशा भावना आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.  कांद्याला हमीभाव, कर्जमाफी, अवकाळीमुळे झालेले नुकसान अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लाँग मार्चची वाट धरली होती.

मात्र, आता सरकाने शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारच्या निवेदनाची प्रत दिली आहे. ही प्रत आंदोलक शेतकऱ्यांना वाचून दाखवणार असल्याचे गावित यांनी यावेळी स्पष्ट करत, लाँग मार्च स्थगित झाल्याची घोषणा केली आहे. गावित यांच्या या घोषणेमुळे गेल्या सात दिवसांपासून मुंबईच्या दिशेने निघालेले लाल वादळ अखेर शमले आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube