बावनकुळेंनी बॉम्ब फोडला : भाजप 240 तर शिवसेनेला फक्त 48 जागा देणार…

बावनकुळेंनी बॉम्ब फोडला : भाजप 240 तर शिवसेनेला फक्त 48 जागा देणार…

मुंबई : 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Legislative Assembly Elections) होणार आहेत. या निवडणुकीत भाजपला राज्यात रोखण्यासाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) चांगलीच कंबर कसली आहे. दोनच दिवसांपूर्वी मुंबईत महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपला नामोहरण करण्याची रणनीती ठरली. तर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shiv Sena) आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढणार आहेत. या दोन्ही पक्षात जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील ठरला आहे. या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याची माहिती दस्तुरखुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी दिली. या निवडणुकीत भाजप 240 तर शिवसेना 48 लढणार असल्याचं त्यांनी सांगतिलं.

 

प्रसिध्दी प्रमुखांच्या बैठकीला संबोधित करतांना बावनकुळे यांनी सांगितले की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळं आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज राहा. ते म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा आहेत. या निवडणुकीत आपला पक्का विजय आहे. 160-165 जागांवर भाजप निवडून येईल. या निवडणकीत भाजपनं 240 जागा लढवण्याची तयारी केली आहे. तर शिवसेनेला केवळ 48 जागा मिळतील. कारण, शिवसेनेकडे 50 पेक्षा जास्त जागांसाठी चांगले उमेदवार नाहीत, असं सांगितलं.

आपण 240 जागांवर निवडणूक लढणार असल्यानं आता तुम्हाला रात्रंदिवस काम करून निवडणुकीची तयारी करावी लागेल. तुमच्याकडे खूप काम असणार आहे. तुम्हाला तुमची टीमही सतर्क ठेवावी लागणार आहे, असं सल्लाही बानकुळेंनी प्रसिध्दी प्रमुखांना दिला.

Pune-Mumbai Express Way : ‘या’ कारणामुळे नवीन कात्रज बोगदा बंद ठेवणार!

40 आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यांनी केलेल्या बंडामुळं ठाकरे सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवरच दावा केला. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. सध्या या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, बावनकुळे यांनी शिवसेनेला 48 जागा देणार असं वक्तव्य केल्यानं राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिले भाषण केले, तेव्हा पुढच्या निवडणुकीत म्हणजे 2024 मध्ये आम्ही आणि भाजप 200 मध्ये एकत्र येऊ, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली होती. आणि आता चंद्रशेखर बानवकुळेंनी शिवसेनेला फक्त 48 जागा देणार असं सांगितलं. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यात जागावाटपावरून वाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बावनकुळेंच्या वक्तव्यावर आता शिंदे गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube