Pune-Mumbai Express Way : ‘या’ कारणामुळे नवीन कात्रज बोगदा बंद ठेवणार!

  • Written By: Published:
Katraj Tunel

पुणे : कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी १८ मार्च रोजी रात्री ११ ते १९ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. तसेच २३ मार्च रोजी रात्री ११ ते २४ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन कात्रज बोगद्यात व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यात येणार आहे. ही सर्व कामे रात्रीच्या वेळी करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवार (दि. १८) आणि रविवार (दि. १९) तसेच गुरुवार (दि.२३) आणि शुक्रवार (दि. २४) या दिवशी रात्री ११ ते पहाटे २ वाजेपर्यंत या बोगद्यातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

Sushma Andhare : अनिल देशमुखांनी जसा राजीनामा दिला तसा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देणार का?

दरम्यान, या काळात वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जुन्या कात्रज बोगद्यातून ही वाहतूक वळवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags

follow us