MLA Amol Khatal Action Against Illegal Sand Mafia : संगमनेरमधील (Sangamner) वाळू माफियांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी ( MLA Amol Khatal) धडक कारवाई केली आहे. त्यांनी अवैध वाळू तस्करांचा पाठलाग (Illegal Sand Mafia) करत कारवाई केल्याची माहिती मिळतेय. संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी शिवारातील तनपूरवाडी रस्त्यावर काल रात्री आमदार अमोल खताळ सामाजिक कार्यक्रमावरून परतत होते. त्यावेळी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर अमोल खताळ यांनी स्वतः कारवाई केली.
ही घटना उघडकीस आल्यानंतर तालुक्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली (Sangamner News) आहे. आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शाल टॉवेल इतकीच आणली का?, ‘महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’ उद्घाटनात अजित पवारांची टोलेबाजी
आमदार खताळ यांनी स्वतःचे वाहन थांबवत तात्काळ पोलीस (Sangamner Crime) प्रशासनाला पाचारण केले. संबंधित वाळू वाहतूक करणारी गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, मला आमदार असूनही रस्त्यावर उतरून ही कारवाई करावी लागते, मग प्रशासन झोपलंय का? संगमनेरमध्ये काही भागांमध्ये अवैध वाळू माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. हे वाळू माफिया कोणाच्या छत्रछायेखाली काम करत आहेत हे सर्व तालुक्याला माहीत आहे. यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई केली जाईल, असा मी शब्द देतो.
“मी स्वतः अवैध वाळू माफियांना पकडलं…मग प्रशासन झोपलंय का? संगमनेरमधील रायतेवाडी शिवारातील तनपूरवाडी रस्त्यावर हा प्रकार आम्ही उघडकीस आणला. लोकांना या माफियांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतोय!
संगमनेर मध्ये काही लोकांशी हातमिळवणी करून अवैधरित्या वाळू चोरी केली जाते आहे.… pic.twitter.com/a0M4tg9bpn
— Amol Khatal Patil – अमोल खताळ पाटील (@amolkhatalpatil) May 5, 2025
मोठी बातमी! इंडियन आयडल 12 चा विजेता पवनदीप राजनचा भीषण अपघात, प्रकृती गंभीर
अमोल खताळ पुढे म्हणाले की, या माफियांमुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर झीज होते, शेतीचे नुकसान होते. बेफाम वाहनचालकांमुळे नागरिकांना दहशतीखाली (Sand Smuggling) जीवन जगावं लागत आहे. प्रशासनातील काही घटक वाळू माफियांशी हातमिळवणी करून हा व्यवसाय चालवत आहेत. पण आता याला आळा बसेल, असा विश्वास मी जनतेला देतो.
ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी आमदार अमोल खताळ यांच्या या धाडसी कृतीचे कौतुक केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला अवैध वाळू उपसा आमदार अमोल खताळ यांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे थांबेल, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमध्ये उमटत आहे.