मोठी बातमी! इंडियन आयडल 12 चा विजेता पवनदीप राजनचा भीषण अपघात, प्रकृती गंभीर

Indian Idol 12 Winner Pawandeep Rajan Accident : सोनी टीव्हीवरील गायन रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल सीझन 12’ चा विजेता पवनदीप राजनच्या (Pawandeep Rajan) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आज म्हणजेच 5 मे रोजी सकाळी उत्तराखंडहून दिल्लीला जात असताना पवनदीपचा अपघात झाला. अपघातावेळी त्याच्यासोबत आणखी दोन लोक होते. त्याच्या गाडीने मागून एका कॅन्टरला धडक (Pawandeep Rajan Accident) दिली, त्यामुळे हा मोठा अपघात (Accident) झाल्याचं सांगितलं जातंय. आपल्या उत्तम गायनाने कोट्यवधी लोकांची मने जिंकणारा पवनदीप राजन हा उत्तराखंडचा रहिवासी आहे.
टीव्ही नाईन हिंदीने दिलेल्या माहितीनुसार, पवनदीप राजन (Indian Idol 12 Winner Pawandeep Rajan) आता धोक्याबाहेर आहे. हा अपघात आज पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी घडल्याचं सांगितलं जातंय. चालकाला अचानक झोप लागली आणि त्याची गाडी मागून रस्त्यावर उभ्या असलेल्या कॅन्टरला धडकली. उत्तराखंडहून दिल्लीला जात असताना गजरौला पोलीस स्टेशन परिसरातील राष्ट्रीय महामार्ग 9 वर हा अपघात झाला.
राष्ट्रवादीच्या नाहाटाकडून योजनेच्या नावाखाली कोट्यवधीचा गंडा ! गुन्हा दाखल होताच फरार
अपघातानंतर तिघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर सर्वांना चांगल्या उपचारांसाठी दिल्लीला रेफर करण्यात आले. पवनदीपची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळतेय. त्याच्या एका हाताला आणि दोन्ही पायांना जखमा आहेत.
पवनदीप राजन कोण आहे?
पवनदीप राजन हे केवळ एक प्रसिद्ध गायक नाहीत तर एक प्रतिभावान संगीतकार देखील आहेत. त्याने आपल्या प्रतिभेने संपूर्ण चित्रपटसृष्टीला प्रभावित केले आहे. 2015 मध्ये ‘द व्हॉइस इंडिया’ या गायन रिअॅलिटी शोमध्ये विजय मिळवून पवनदीपने पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली. तो विविध वाद्ये देखील वाजवू शकतो. पवनदीप हार्मोनियम, सिंथेसायझर, तबला आणि ढोल अशी अनेक वाद्ये अतिशय कुशलतेने वाजवतो.
राष्ट्रवादीच्या नाहाटाकडून योजनेच्या नावाखाली कोट्यवधीचा गंडा ! गुन्हा दाखल होताच फरार
2021 मध्ये, पवनदीपने सोनी टीव्हीच्या गायन रिअॅलिटी शो ‘ इंडियन आयडल 12 ‘ चा किताब जिंकून आणखी एक मोठे यश मिळवले . या विजयामुळे तो देशातील प्रत्येक घरात प्रसिद्ध झाला. दमदार कामगिरीमुळे तो प्रेक्षकांचा आणि परीक्षकांचा आवडता बनला. पवनदीपची उत्तराखंडचा युवा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही निवड झाली आहे.