ऋषी सिंहने जिंकले इंडियन आयडॉल 13 चं विजेतेपद

Untitled Design   2023 04 03T081706.988

मुंबई : गाण्यासाठी प्रसिद्ध असलेला रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल’ने देशाला आतापर्यंत 12 असे सर्वोत्कृष्ट गायक दिले आहेत. आणि या शोचा 13 वा विजेता कोण होणार याकडे प्रेक्षक डोळे लावून बसले होते. अखेर या शोच्या विजेत्याची घोषणा झाली आहे. इंडियन आयडॉल 13 ची (Indian Idol 13 Winner) विजेती ट्रॉफी अयोध्येतील रहिवासी ऋषी सिंहने (Rishi Singh)जिंकली आहे. यामुळे आता या स्पर्धेच्या माध्यमातून देशाला 13 वा गायक मिळाला आहे.

गेली अनेक महिने आपल्या मधुर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या इंडियन आयडॉल या स्पर्धेत अनेक स्पर्धकांमध्ये रस्सीखेच झाल्याचे देखील पाहायला मिळाले. अनेक चढ-उतारांच्या दरम्यान हा शो अखेर ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचला आणि सीझन 13 चा विजेता ठरला. या फिनालेमध्ये नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया परीक्षकाच्या भूमिकेत होते. तर आदित्य नारायण याने यशस्वीपणे या फिनालेचं यशस्वीपणे निवेदन केलं.

Eknath Shinde : सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून संभाजीनगरमध्ये बसले

या स्पर्धकांमध्ये रंगली स्पर्धा
इंडियन आयडॉल 13 च्या टॉप 6 फायनलिस्टमध्ये ऋषी याच्यासह शिवम शाह, चिराग कोतवाल, बिदिप्ता चक्रवर्ती, देबस्मिता रॉय आणि सोनाश्री कर यांचा समावेश होता. मात्र लाईव्ह वोटिंगच्या आधारावर स्पर्धेतील विजेता ठरणार होता. यामुळे ऋषी सिंह याला जनतेचे सर्वाधिक वोट मिळाले. यासह ऋषीने इंडियन आयडल 13 चा विजेता होण्याचा बहुमान मिळवला. तर देबोस्मिता राय प्रथम उपविजेते आणि चिराग कोतवाल द्वितीय उपविजेते ठरले.

नाना पटोले यांचे विमान आले, पण नाना आलेच नाही; नाना नाराज का?

विजेत्यावर बक्षिसांचा पाऊस
विजेत्या ऋषी सिंहला 25 लाख रुपयांच्या रोख बक्षीसांसह एक चमकदार ट्रॉफी, मारुती सुझुकी एसयूव्ही कार, सोनी म्युझिक इंडियासोबत रेकॉर्डिंग करार आणि इतर अनेक आकर्षक बक्षिसे मिळाली.

Tags

follow us