Mla Disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खुर्चीचं पावित्रं राखावं, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना(Rahul Narvekar) दिला आहे. दरम्यान, आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सध्या विधी मंडळात सुरु आहे. आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवर बोलताना नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पटोले यांनी मुंबईतून माध्यमांशी संवाद साधला.
ममतांनी शांत राहुन केला अदानी समूहाचा कार्यक्रम; तब्बल 25 हजार कोटींचा प्रकल्प काढून घेतला!
नाना पटोले म्हणाले, आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ठरावीक वेळेत घ्यायला हवी होती. महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजाचे नाव देशात घेतले जाते पण भाजपाने घाणेरडे राजकारण करत या लौकिकाला कलंक लावला असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
CM शिंदे जाणार एकुलत्या एक उमेदवाराच्या प्रचाराला, अशोक गेहलोतांना देणार टक्कर
तसेच विधानसभा अध्यक्षांवर सर्वोच्च न्यायालयाला सुप्रीम कोर्टाला ताशेरे ओढावे लागले ही कलंक लावणारी बाब आहे. विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीचे पावित्र राखले पाहिजे. लोकसभा अध्यक्षपदाचे नेतृत्वही महाराष्ट्राने केलेले आहे पण आज जे चालले आहे ते बरोबर नसल्याचंही नाना पटोले म्हणाले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने मी आज आमदार असल्याचं विधान शिवसेनेचे नेते सुनिल प्रभू यांनी सुनावणीवेळी केलं आहे. नामोल्लेख सुद्धा कामकाजात येऊ द्यायचा नाही, असे कामकाज होत असेल तर फारच चुकीचे असल्याचंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
Eknath Khadse : ‘मराठा समाजाला दिलेला शब्द पाळा’; खडसेंनी फडणवीसांना घेरलं
राज्यात सुरु असलेल्या अशा राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत असेल तर आयुधांच्या माध्यमातून प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे व आम्ही या प्रश्नी अधिवेशनात प्रश्न विचारणार असल्याचंही नाना पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान, आमदार अपात्रता सुनावणीत आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या उलट तपासणीला सुरुवात झाली. सुनावणीत साक्षीसाठी काय रेकॉर्डवर घेतलं जात आहे हे दिसण्यासाठी नवीन स्क्रीन लावण्यात आली आहे. सुनील प्रभू यांना विविध मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न काल शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. इंग्रजी भाषेतील याचिकेवरून झालेल्या वादानंतर आज भाषांतर करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. आज व्हीपच्या मुद्द्यावरून सुनील प्रभूंना जेठमलानी यांनी घेरले आहे