Gopichand Padalkar On Rohit Pawar : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणु हांडे यांचा सोलापुरात फिल्मी स्टाईल अपहरण करण्यात आल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCPSP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात आरोप- प्रत्यारोप करण्यात येत आहे. तर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणात भाष्य करत रोहित पवार बालिश माणूस असल्याची टीका केली आहे. आमदार पडळकर आज माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, मी आरोप केले नाहीत. ज्या कार्यकर्त्याचे अपहरण करण्यात आले होते त्याने मीडियाला माहिती दिली आहे. या प्रकरणात पोलीस तपास करत आहे. रोहित पवारांनी एवढा घाबरुण जाण्याचे कारण काय? जे काही असेल पोलीस तपासात समोर येईल असं माध्यमांशी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.
रोहित पवार बालिश माणूस आहे – आमदार गोपीचंद पडळकर@RRPSpeaks @GopichandP_MLA @NCPspeaks @BJP4Maharashtra pic.twitter.com/uSx9QJYdu8
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 8, 2025
तर रोहित पवार यांच्यावर टीका करत आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, रोहित पवार बालिश माणूस आहे. त्यांना असं वाटते की, मी मंत्र्यांविरोधात बोलतो तर महाराष्ट्रात वातावरण निर्माण होत आहे. मात्र हा त्यांचा गोड गैरसमज आहे. कुठल्या मंत्र्यांविरोधात बोलणं आणि न बोलणं विरोधकांचा अधिकार आहे. रोहित पवार यांनी मंत्र्यांविरोधात बोलत राहावं. पण रोहित पवार यांना नेते होण्याची घाई झाली आहे. पण त्याला खूप अवकाश आहे. अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर केली आहे. तसेच रोहित पवार कुठला विषय कुठे नेत आहे हे आता त्यांनी थांबवले पाहिजे. असं देखील माध्यमांशी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. तर 2021 मध्ये माझ्या गाडीवर शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता असा आरोप देखील यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
लव्हस्टोरी, घोस्ट कॉमेडीचा धमाका; ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित
तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणु हांडे यांनी रोहित पवार यांचे समर्थक अमित सुरवसेवर अपहरण करण्याचा आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा गंभीर आरोप केला आहे. सध्या या प्रकरणावरुन आमदार रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर शरणु हांडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.