येणाऱ्या निवडणुका महायुती सोबत लढणार? सांगता येणार नाही; आमदार काशिनाथ दाते

MLA Kashinath Date On Upcoming Elections : राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार असून शासनाच्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लवकर होतील, यासाठी पक्षाची ताकद अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात वाढवायची (coming elections) आहे. महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढवल्या जातील किंवा नाही, हे आता आपल्याला सांगता येणार नाही. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा […]

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics

MLA Kashinath Date On Upcoming Elections : राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार असून शासनाच्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लवकर होतील, यासाठी पक्षाची ताकद अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात वाढवायची (coming elections) आहे. महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढवल्या जातील किंवा नाही, हे आता आपल्याला सांगता येणार नाही. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे, असे वक्तव्य आमदार काशीनाथ दाते (MLA Kashinath Date) यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात स्वाभिमान मंगल कलश यात्रेला सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे शुभारंभ झाला आहे. 30 एप्रिल रोजी शिर्डी येथे आगमन होणारअसून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नियोजनाची बैठक (Maharashtra Politics) ज़िल्हाअध्यक्ष अशोकराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली अन् आमदार काशिनाथ दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. माणिक विधाते, अण्णासाहेब शेलार, प्रशांत गायकवाड, संजय कोळगे, क्षितिज घुले, संतोष धुमाळ, सुरेश बनसोडे, दत्तात्रेय पानसरे, आशा निंबाळकर, सचिन डेरे, अकुंश गर्जे, साईनाथ भगत व जिल्ह्यातील सर्व संघाचे जिल्हाध्यक्ष, महिला पदाधिकारी, शहराचे पदाधिकारी उपस्थित होते.

Pahalgam Terror Attack: ‘तो’ तिनदा अल्लाहू अकबर म्हटला आणि गोळीबार… हल्ल्याचा गुजरातच्या पर्यटकाने सांगितला थरार

यावेळी आमदार काशिनाथ दाते म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार असून शासनाच्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करत असून पक्षवाढीचे काम आपल्या सर्वांना करावे लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लवकर होतील, यासाठी पक्षाची ताकद अहिल्यानगर जिल्ह्यात वाढवायची आहे.

महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढवल्या जातील किंवा नाही हे आता आपल्याला सांगता येणार नाही, प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे आपली ताकद वाढली तर पक्षाला फायदा होईल. तरी पक्षातील कार्यकर्त्यांनी आपसातले मतभेद बाजूला ठेवून पक्ष वाढीचे काम करावे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र स्वाभिमान मंगल कलश यात्रा दिनांक 30 एप्रिल रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात येणार असून पक्षाच्या वतीने जल्लोषात स्वागत केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

‘ संधी मिळाल्यास…मराठी नाटक आवर्जून बघा’; अभिनेते परेश रावल यांनी सांगितला खास अनुभव

जिल्हाध्यक्ष अशोक सावंत म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र स्वाभिमान मंगल कलश यात्रा 30 एप्रिल रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आगमन होणार आहे. या ठिकाणी प्रवरा व गोदावरी नदीतील पाणी कलश मध्ये टाकले जाणार असून, श्री शनिशिंगणापूर येथील माती कलशामध्ये टाकली जाणार आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयाजवळ कलश यात्रेचे स्वागत जिल्ह्याच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यानंतर कलश यात्रा पारनेरकडे रवाना होणार असून, पारनेर येथे रथयात्रेचा समारोप होणार आहे.

मंत्री महोदय राहणार उपस्थित

यावेळी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री नरहरी झिरवाळ , माजी आमदार अनिल भाईदास, उपस्थित राहणार आहे. तरी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलश रथयात्रेचे स्वागत मोठ्या उत्साहात करायचे आहे असे ते म्हणाले.

 

Exit mobile version