‘ संधी मिळाल्यास…मराठी नाटक आवर्जून बघा’; अभिनेते परेश रावल यांनी सांगितला खास अनुभव

Paresh Rawal Statement on Marathi Drama : प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनी (Paresh Rawal) मराठी नाटकांवर मोठं भाष्य केलंय. त्यांनी मराठी नाटकातून खूप काही शिकायला मिळतं, अशी टिप्पणी देखील केली (Marathi Drama) आहे. सोबतच त्यांनी मराठी लेखकांचं कौतुक करत म्हटलंय की, आपण खूपच भाग्यवान (Entertainment News) आहोत. ते लल्लन टॉपला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
यावेळी परेश रावल यांनी आठवणींना उजाळा देताना म्हटलं की, मराठी थिएटर जास्त व्हायचे. त्यांना बघायचो. सगळ्यांचेच नाटकं बघायचो. अरविंद देशपांडे, श्रीराम लागु, या सगळ्यांचे नाटकं बघायचो. जे पण मराठी नाटक यायचं, ते बघायला जायचो. आपण खूप लकी आहोत की, मराठी लोकं इतकी चांगली नाटकं करतात. खूप काही शिकायला मिळतं. त्यांच्याकडे कमालीचे लेखक आहेत. खूपच नाविण्यपूर्ण लिखाण करतात. खूपचं पुढचं.
एटीएम शुल्कात वाढ करण्यास मान्यता; रिझर्व्ह बँकेचं नवं धोरण जाहीर, वाचा काय आहेत बदल?
जर तुम्हाला संधी मिळाली तर प्राजक्त देशमुखचं मराठी नाटक देवबाभळी नक्की बघा, म्युझिकल नाटक आहे. या नाटकात संत तुकाराम आणि विठ्ठल यांच्या पत्नींचे संभाषण दाखवले आहे. यावेळी दोन्हीही गरोदर असतात. परंतु भक्ताची पत्नी गरोदर असताना तिची काळजी घेण्यासाठी, देव स्वत:च्या पत्नीला पाठवतो. यावेळी दोघी मिळून आपल्या पतींविषयी संभाषण करतात, ते खूपच वेगळं अन् खास आहे, असं परेश रावल यांनी लल्लन टॉपला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.
कलाविश्वात शोककळा! प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
लल्लनटॉपचे संपादक सौरभ द्विवेदी यांच्याशी झालेल्या या मनोरंजक संभाषणात त्यांनी थिएटरपासून ते उरी, वेलकम, हेरा फेरी आणि ओएमजी, या सर्व चित्रपटांवर भाष्य केलंय. हे असे चित्रपट आहेत, ज्यांच्या माध्यमातून परेश रावल यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याशिवाय हंगामा, हलचल, गरम मसाला यांसारख्या चित्रपटांचेही खूप कौतुक झाले आहे. संभाषणादरम्यान परेश रावल यांनी चित्रपटसृष्टीतील बदल, त्यांचा नाट्यप्रवास आणि पुरस्कार सोहळ्यांमधील पक्षपात याबद्दल मोकळेपणाने बोलले. त्यांनी आमिर खान, नसीरुद्दीन शाह, अक्षय कुमार, इरफान खान, सलमान खान आणि शाहरुख खान सारख्या स्टार्ससोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला.