दहशतवाद्यांकडे धर्म विचारून गोळ्या घालण्यासाठी वेळ? आधी वादग्रस्त वक्तव्य…आता यु-टर्न, वडेट्टीवारांनी मागितली पीडित कुटुंबांची माफी

दहशतवाद्यांकडे धर्म विचारून गोळ्या घालण्यासाठी वेळ?  आधी वादग्रस्त वक्तव्य…आता यु-टर्न, वडेट्टीवारांनी मागितली पीडित कुटुंबांची माफी

Vijay Wadettiwar After Pahalgam Terror Attack Controversial Statement : पहलगाम हल्ल्यासंदर्भात कॉंग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी पीडित कुटुंबांची माफी (Pahalgam Terror Attack) मागितली आहे. सोबतच सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केलाय. आज माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की, मी जे वक्तव्य काल केलं होतं.. ते तोडून मोडून दाखवलं गेलंय.

दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबांना अन् मृत व्यक्तींना जात धर्म अन् कलमा वाचायला लावला होता. मग त्यांच्यावर हल्ला केला. यामागे पाकिस्तानचा हेतु हिंदुस्तानला कमजोर करणं. आपापसांत भांडणं करायला लावणं (Maharashtra Politics) असा होता. मी असं म्हटलो होतो की, दहशतवाद्यांकडे जात अन् धर्म विचारायला वेळच नसतो. असं पहिल्यांदा झालंय. माझं हेच वाक्य केवळ दाखवण्यात आलं. याच्या मागील अन् पुढील वक्तव्य मात्र दाखवलं गेलं नाही.

बॉलिवूडकडून सक्षम कलाकारांची हत्या…अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य, जाणून घ्या काय आहे सत्य?

माझ्या विधानाने कोणाला त्रास झाला असेल, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यासाठी माफी मागतो. माझं बोलणं अर्धवट दाखवून केंद्र सरकार, सत्ताधारी पक्ष अन् इंटेलिजन्सचं अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जातोय, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांवरच खापर फोडलंय.

या हल्ल्यात ज्या निष्पाप लोकांचे प्राण गेलेत, त्याविषयीच मी म्हटलं होतं की, अतिरेक्यांकडे एवढा वेळ नसतो. परंतु असं पहिल्यांदाच झालंय. धर्म विचारून त्यांचा जीव घेतला गेला. गोळी मारली गेलीय. परंतु हे ज्या पद्धतीने समोर आणलं, त्यामुळे वाईट वाटत असल्याचं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलंय. अर्धवट वक्तव्य दाखवून कॉंग्रेसला बदनाम करण्याचं काम मिडिया करत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

Blackout : तांत्रिक बिघाडामुळे पोर्तुगाल स्पेनमध्ये अंधार; वीज पुरवठा खंडित, सर्व सेवा विस्कळित

माध्यमांनी मी केलेले वक्तव्य तोडून मोडून दाखवले. काही माध्यमांनी माझे वक्तव्य अर्धवट दाखवले. राहुल गांधी यांनी मांडलेली भूमिका आमच्या पक्षाची भूमिका आहे. पीडित (मृतांच्या )कुटुंबाला वेदना झाल्या असतील तर मी माफी मागतो, असं देखील त्यांनी म्हटलंय. हा हल्ला भारतावरचा हल्ला होता. तब्बल 26 वर्षांनंतर असा हल्ला झालाय. सरकारचं अपयश लपवण्यासाठी असा संभ्रम निर्माण केला जातोय. देशात दोन धर्मात भांडणं लावून देश कमजोर करण्याचा हेतू पाकिस्तानचा होता, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube