Manipur violence : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या (Manipur violence) घटना घडत आहेत. काल विद्यार्थ्यांनी राजभवनावर काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी (police) लाठीमार केला. यात किमान 40 विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे कंगपोकी जिल्ह्यात दोन सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरादार टीका केली.
शेतकऱ्यांना आता 24 तास वीज मिळणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असंवेदनशील आहेत आणि केंद्र सरकार निगरगट्ट झालेय, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
मणिपूर पेटले!
वर्तमानपत्रातील या हेडलाईन्ससुद्धा आता सामान्य झाल्या आहेत, इतकं केंद्र सरकार निगरगट्ट आहे.
मणिपूरमधील परिस्थिती चिघळून आता जवळपास १६ महिने होतील. तेथील हिंसाचारात आजवर असंख्य बळी गेले आहेत आणि मुली, बहिणी, माता लैंगिक अत्याचाराला बळी पडतायत, इंटरनेट सेवा बंद आहेत,… pic.twitter.com/XoaUmpe7kz— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 11, 2024
सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्ट करत आव्हाड यांनी लिहिलं की, मणिपूर पेटले! वर्तमानपत्रातील हेटलाईन्ससुद्धा आता सामान्य झाल्या आहेत, इतंक केंद्र सरकार निगरगट्ट आहे. मणिपूरमधील परिस्थिती चिघवून आता जवळपास 16 महिने होतील. तेथील हिंसाचारात आजवर अनेक बळी गेले आहेत आणि मुली, बहिणी, माता लैंगिक अत्याचाराला बळी पडतायत, इंटरनेट सेवा बंद आहेत, शेकडोंनी नागरिक, विद्यार्थी जखमी झालेत, शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत, स्वतंत्र भारतातील नागरिक सरकारी छावण्यांत राहतायत, पण कुणाला कसलाही फरक पडत नाहीए, असं आव्हाड म्हणाले.
देशाच्या पंतप्रधानांना युक्रेन-रशियाचं युद्ध मिटवण्यात स्वारस्य आहे. परंतु ते एकदाही मणिपुरात गेलेले नाहीत. देशाचे सर्वांत ढोंगी आणि असंवेदनशील पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाची नोंद करावी लागले, असंही आव्हाड म्हणाले.
दरम्यान, मणिपूर हिंसाचारवरून विरोधक सातत्याने पंतप्रधान मोदींवर टीका करत आहे. आता आमदार आव्हाडांनी केलेल्या टीकेला आता भाजप काय प्रत्युत्तर देते, हेच पाहणं महत्वाचं आहे.