शेतकऱ्यांना आता 24 तास वीज मिळणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना आता 24 तास वीज मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलीयं. दरम्यान, सध्या शेतकऱ्यांना वीजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचं चित्र आहे. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांचं वीजबिल माफ केलं असून यासोबतच सौर कृषी वाहिनी योजनाही आणलीयं. त्यामुळे आता शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय.
राहुल गांधींनी नेहमीच देशाची सुरक्षा अन् भावना दुखवल्या; अमित शाहांचा ‘एक्स’वर वार
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्याता आलायं. सरकारकडून शेतकऱ्यांचं वीजबिल माफ करण्यात आलं असून आता शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही. यासोबतच शेतकऱ्यांसाठी सरकारने सौर कृषी वाहिनी योजना आणलीयं. राज्यात शेतकऱ्यांना 16 हजार मेगावॅट विजेची आवश्यकता आहे. त्यापैकी 12 हजार मेगावॅटची वीज हरित ऊर्जीकरण किंवा सोलरमध्ये रुपांतर सुरु करण्यात येणार आहे. पुढील दीड वर्षांत हे रुपांतर होणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
“जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षण..” राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यांवर अमित शाह संतप्त
तसेच 4 हजार मेगावॅट विजेचं काम सुरु असून पुढील 2 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या विजेचा युनिट हा सोलरचा असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज मिळणार असून त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही, म्हणजे विजेचं बिलंही नाही आणि 24 वीज देण्याचं काम महायुतीचं सरकार करत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.
साडेतीन हजार शाळांना कुलूप; शिक्षण विभागाच्या रिपोर्टने पाकिस्तानात खळबळ
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना शेतीला रात्री वीज पुरवठा करताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर, शेतीला वीज देण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची मुहूर्तमेढ रोवलीयं. या योजनेंतर्गत खासगी पडीक जमिनींवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचेही नियोजन आहे. या योजनेंतर्गत उभारल्या जाणाऱ्या उपकेंद्रापासून पाच किलोमीटर परिघातील शेतकऱ्यांना प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करुन देता येईल. या जागेवर साैरप्रकल्प उभारल्यानंतर तो थेट उपकेंद्राशी जोडले जाणार आहे. उपकेंद्रातून वीज एकत्रित करुन ती त्या त्या भागातील कृषी क्षेत्राला उपलब्ध करुन दिली जाणार आहे.