राहुल गांधींनी नेहमीच देशाची सुरक्षा अन् भावना दुखवल्या; अमित शाहांचा ‘एक्स’वर वार

राहुल गांधींनी नेहमीच देशाची सुरक्षा अन् भावना दुखवल्या; अमित शाहांचा ‘एक्स’वर वार

Minister Amit Shaha On Rahul Gandhi : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नेहमीच देशाची सुरक्षा आणि भावना दुखावल्या असल्याचा वार केंद्रीय मंत्री अमित शाहा (Amit Shah) यांनी एक्सवरुन काँग्रेस नेते राहुल गांधींवर केलायं. दरम्यान, राहुल गांधी यांनी अमेरिकेत वादग्रस्त विधान केल्यावरुन चांगलच राजकारण तापलंय. सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांधी यांना फैलावर घेतलं जात आहे. अशातच आता अमित शाहा यांनीही एक्सवरुन गांधी यांच्यावर वार केलायं.

अमित शाहा यांनी विविध मुद्द्यांवरुन राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय. एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अमित शाहा म्हणाले, राहुल गांधी यांची वक्तव्ये फुटीरतावादी विचारसरणी दर्शवतात. देशविरोधी विधाने करणे आणि बोलणाऱ्यांसोबत उभं राहणं त्यांची सवयचं झालीयं. राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षणविरोधातला चेहराही उघड केलायं. त्यांनी नेहमीच देशाची सुरक्षा आणि भावना दुखावल्या असल्याचं अमित शाहा म्हणाले आहेत.

..म्हणून अजितदादा बारामतीतून निवडणूक लढवायला घाबरतात; माजी मंत्र्याने कारणही सांगितलं

तसेच जम्मू काश्मीरमध्ये जेकेएसनीच्या देशविरोधाी आरक्षणविरोधी अजेंड्याचं समर्थन करणं असो किंवा परदेशात भारतविरोधी वक्तव्य असो, त्यांनी नेहमीच सुरक्षा आणि देशाची भावना दुखावलीयं. ते भाषा प्रदेश धर्म यांच्या भेद निर्माण करण्याची वक्तव्य फुटीरवादी विचासरणी दाखवतात, त्यांच्या मनातले विचार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर येत असल्याचं अमित शाहा म्हणाले आहेत.

लोकसभेचीच पुनरावृत्ती! महायुतीला धोबीपछाड, महाविकास आघाडी सुसाट; धक्कादायक सर्व्हे समोर

काँग्रेसकडून नेहमीच भाजपवर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन टीका-टिप्पणी केली जात आहे. त्यावरुनही अमित शाहा यांनी राहुल गांधींना सुनावलंय. देशात भाजप आहे तोवर आरक्षणाला कोणी धक्का लावू शकत नाही हे राहुल गांधींना मी सांगतो तर देशाच्या एकतेशी कोणी छेडछाडही करु शकणार नाही, असं अमित शाहा म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते राहुल गांधी?
अमेरिकेत बोलताना राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. ते म्हणाले, जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं राहुल गांधी काल एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यांच्या विधानावर त्यांच्या विरोधकांकडून टीका केली जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube