शिखांना भारतात पगडी अन् कडं घालण्याची परवानगी आहे का?, राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार

  • Written By: Published:
शिखांना भारतात पगडी अन् कडं घालण्याची परवानगी आहे का?, राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार

Rahul Gandhi in America : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अनेक ठिकाणी कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. (Rahul Gandhi) दरम्यान, ते त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर ते सडकून टीका करताना दिसून येत आहेत. त्यांच्यावर सातत्याने भारतविरोधी विधानं करत असल्याचा आरोप होतोय.

video : भारतातील आरक्षण केव्हा संपणार?, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच मोठ विधान

भाजप प्रवक्ते

काल त्यांनी भारतातल्या शिखांचा छळ होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. अमेरिकेत भारतीय समूदायाच्या लोकांशी संवाद साधताना त्यांनी एका व्यक्तीला त्याचं नाव विचारलं आणि म्हटलं की, भारतामध्ये या मुद्द्यावरुन वाद आहे, एका शीख व्यक्तीला पगडी आणि कडं घालण्याची परवानगी नसते. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की एक शीख गुरुद्वारात जाऊ शकतो का? ते पुढे म्हणाले की, भारतातील शिखांच्या बाबतीमध्ये आजपर्यंत कधीच कुणी असं म्हटलं नसेल. शिखांना देशात कडं घालण्यासाठी किंवा गुरुद्वारात जाण्यासाठी परवानगी नाही. राहुल यांच्या या विधानाचा भाजप राष्ट्रीय प्रवक्ते आरपी सिंह यांनी राहुल गांधींनी कोर्टात खेचण्याची भाषा केली आहे. ‘आज तक’ने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.

जर निष्पक्ष निवडणुका झाल्या असत्या तर भाजपाला  राहुल गांधींचा खळबळजनक खुलासा

काय म्हणाले हरदीप सिंग

१. भारतात शिखांना पगडी घालण्याचा आणि कडं घालण्याचा अधिकार नाही, असे राहुल गांधी म्हणतात. पण भारतात शीख पगडी आणि कडं तर घालतातच पण त्यांचं कृपाण घालून कुठेही जाऊ-येऊ शकतात. 4 मार्च 2022 रोजी सरकारने पुन्हा एकदा यासंदर्भात कोणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून आदेश दिले होते. बीसीएएसने या आदेशात म्हटले होते की, केवळ शीख प्रवासीच कृपाण बाळगू शकतात. ब्लेडची रुंदी सहा इंचांपेक्षा जास्त नसेल आणि एकूण लांबी नऊ इंचांपेक्षा जास्त नसेल, अस नियम आहे.

२. शिखांना देशभरात कायदेशीर सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे ते बाईक किंवा स्कूटर चालवतानाही पगडी घालू शकतील. जर कोणी सरदार पगडी घालून स्कूटर किंवा बाईक चालवत असेल तर त्याला मोटार वाहन कायद्यांतर्गत कोणताही दंड आकारला जाऊ शकत नाही. इतर कोणत्याही धर्माच्या लोकांना असा अधिकार नाही, जर कोणी हिंदू किंवा मुस्लिम पगडी घालून स्कूटर किंवा बाईक चालवत असेल तर त्याला तत्काळ चलान लागते.

३. देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे पंजाबमध्ये असलेले सुवर्ण मंदिर. येथे येणाऱ्या लोकांची सर्वाधिक टक्केवारी हिंदू आहे. गुरूंबद्दल आदर केवळ शीखांमध्येच नाही तर भारतातील इतर धर्मांमध्येही आहे. बांगला साहेब गुरुद्वारा हे देशाची राजधानी दिल्लीतील सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. शिखांना मिळालेल्या धार्मिक स्वातंत्र्यामुळेच देशभरात गुरुद्वारा पाहायला मिळतात.

४. पगडी घातलेल्या सरदार पटेलांना देशात सर्वत्र मानलं जातं. दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री असोत किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, सरदार सर्वत्र आपले अस्तित्व टिकवून आहेत. भारताच्या मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीतही पगडी घातलेले सरदार दलजीत डोसाज आणि एमी विर्क सारखे कलाकार खूप लोकप्रिय आहेत. अर्शदीप सिंगनेही एक पगडीधारी सरदार म्हणून क्रिकेट संघात आपले स्थान निर्माण केले. याशिवाय अनेक शीख लष्करप्रमुख झाले आहेत. राहुल गांधींच्या या ताज्या विधानाला केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

५. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने गुरुद्वारांना भेट देत असतात. प्रत्येकवेळी त्यांनी पगडी देखील घातली आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात किमान दोन पगडी घातलेले सरदार आहेत. हरदीप सिंग पुरी आणि रवनीत सिंग बिट्टू हे देखील सरदार आणि पगडी घातलेले शीख आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube