काय केलं साहेबांनी? अमित शाहानंतर नरेंद्र मोदींवर शरद पवारांचा हल्लाबोल
Sharad Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपसह (BJP) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (MP Modi) यांच्यावर हल्लाबोल केला.
यावेळी शरद पवार म्हणाले की, आज देशाचा नेतृत्व चुकीच्या लोकांच्या हाती आहे. गेली 10 वर्ष आपण बघितलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतुत्वाखाली आपण सरकार पहिली. हे सरकार शेतकरी असो, अल्पसंख्याक असो, आदिवासी असो, सुशिक्षित असो यांच्या हिताची नाही. या लोकांचे वैशिष्ट्य आहे. या लोकांना देशाचा इतिहास माहिती नाही. संसदेत जर यांचा 50 मिनिटांचा भाषण असेल तर त्यापैकी 20-25 मिनटे हे पंडित नेहरू (Pandit Nehru) यांच्यावर बोलतात.
नेहरू यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांनी देशाच्या विकासात मोठी भूमिका बजावली आणि आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात असं यावेळी शरद पवार म्हणाले.
मोदी अनेकांवर टीका करतात. ज्या लोकांचा देशाच्या स्वातंत्र्यसाठी काहीच वाटा नव्हता ते ज्या लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्यसाठी चटका खाल्ला त्यांच्यावर टीका करण्याचे काम आजचे राज्यकर्ते करत आहे असेही शरद पवार म्हणाले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, कुणीही देशाचा पंतप्रधान असो त्यांची जबाबदारी आहे की देश एकजूट ठेवावा. मात्र काय केलं मोदी साहेबांनी? त्यांनी या देशात एक नवीन वातावरण तयार करण्याचा काम केला. या देशाच्या संविधान बदल्याची प्रक्रिया त्यांनी सुरु केली. या देशाला बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले. शेवटच्या माणसाला हक्क देण्याचा काम त्यांनी केला मात्र आज ज्या संविधानाच्या मार्गाने देश चालला पाहिजे त्या संविधानावर हल्ला करण्याचा काम मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. तसेच समाज एकजूट झाला पाहिजे हे त्यांना मान्य नाही. अशी टीका शरद पवार यांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
पूजा खेडकर नवीन प्रकरणामुळे चर्चेत, पालिकेचा इशारा, नाहीतर संपत्तीचा होणार लिलाव
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी अल्पसंख्याकबाबत विषारी भूमिका मांडली. त्यांनी सांगतिले जर त्यांच्या हातात सत्ता गेली तर हे लोक माता- भगिनींचे मंगळसूत्र हिसकावून घेणार. अशा प्रकारची विषारी भूमिका मोदी साहेबांनी देशासमोर मांडली. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला या विचारांविरुद्ध लढायचे आहे. असेही यावेळी शरद पवार म्हणाले.