पूजा खेडकर नवीन प्रकरणामुळे चर्चेत, पालिकेचा इशारा, नाहीतर संपत्तीचा होणार लिलाव
Pooja Khedkar: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आता पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांच्या नावावर असलेल्या कंपनीला नोटीस पाठवण्यात आली आहे.
कंपनीला कर बुडवल्या प्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. याच बरोबर जर निर्धारीत वेळेत हा कर न भरल्यास कंपनीचा लिलाव करून कर वसूल करण्यात येणार असं देखील या नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तव्यात येत आहे.
माहितीनुसार, पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांच्या नावावर थर्मोव्हेरिटा (Thermoverita) कंपनी आहे. या कंपनीने गेल्या अनेक वर्षांपासून कर बुडवला आहे. जर हा कर निर्धारित वेळेत न भरल्यास पालिका या कंपनीचा लिलाव करून या कराची वसुली करणार असा इशारा पालिकेने दिला आहे.
तर दुसरीकडे जमीन प्रकरणातून शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना रायगडमधील एका हॉटेलमधून अटक केली होती. सध्या त्या कोठडीमध्ये आहेत. याच बरोबर पूजा खेडकर यांचे वडील दिलिप खेडकर (Dilip Khedkar) यांच्यावरही सध्या सरकारी नोकरीत असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांची देखील या प्रकरणात चौकशी करण्यात येत आहे.
पूजा खेडकर यांनी UPSC परीक्षेत (UPSC Exam) अपगंत्व प्रमाणपत्र देऊन IAS ची पोस्ट मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिवाय वडिलांची 40 कोटींची संपत्ती असूनही त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.
“महायुती-मविआ दोघांनी मिळून आरक्षण द्या अन्यथा..” मनोज जरांगेंचा नवा इशारा काय?
तब्बल सहावेळा पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहण्याचे टाळले. सध्या या प्रकरणात पूजा खेडकर यांची चौकशी सुरु आहे.