वयाच्या १४ व्या वर्षांपासून व्हिलचेअरवर; ४ वेळा ‘UPSC’पास पण नोकरी नाकारली, कार्तिक यांची व्यथा
Karthik Kansal : गेली अनेक दिवसांपासून प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरचे प्रकरण देशभरात गाजतय. (UPSC) पूजा खेडकरने विकलांग कोट्याचा गैरफायदा घेत नौकरी मिळवल्याचे अनेक पुरावे रोज सापडत आहेत. त्यामुळे प्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यूपीएससीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. यूपीएससीकडून त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली आहेत. दरम्यान, अशातच आता चारवेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही ‘मस्कुलर डिस्ट्रॉफी’ (muscular dystrophy) असलेल्या एका उमेदवाराला प्रशासकीय सेवेमध्ये नोकरी देण्यात आली नसल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
चारवेळा परीक्षा पास पूजा खेडकरांच्या अडचणीत आणखी वाढ; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगही करणार तपास
कार्तिक कंसल असं यांचं नाव आहेत. त्यांनी आयआयटी रुरकी येथून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. ते सध्या इस्रोमध्ये वैज्ञानिक आहेत. कार्तिक हे वयाच्या १४ व्या वर्षांपासून व्हिलचेअर वापरत आहेत. ते २०१९ ( रँक ८१३), २०२१ ( कँक २७१), २०२२ (रँक ७८४), २०२२ (रँक ८२९) असे चारवेळा यूपीएससी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, तरी देखील ते आज प्रशासकीय सेवेत नाहीत. आणि एकीकडे पूजा खेडकर यांचं प्रकरण समोर आहे. अनेक रुग्णालयांमधून त्यांनी आपण विकलांग असल्याचं प्रमाणपत्र मिळलं असल्याचं उघड झालं. त्यांनी परिक्षाही जास्तवेळा दिली आहे. हे सगळ घडलं असतानाही त्यांना नोकरी मिळाली आहे. त्यामुळे UPSC वरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
मस्कुलर डिस्ट्रॉफीची बाधा
मस्कुलर डिस्ट्रॉफी (Muscular dystrophy) या आजाराचा समावेश इंडियन रिव्हेन्यू सर्व्हिस ग्रुप A मध्ये आहे. कार्तिक यांचा तो दुसरा प्राधान्यक्रम होता. तरी देखील त्यांना सेवेमध्ये सामावून घेण्यात आलेलं नाही. AIIMS च्या मेडिकल बोर्डाने सांगितलं की, त्यांच्या मांसपेशी कमकूवत आहेत. त्यांच्या हात आणि पाय यांना मस्कुलर डिस्ट्रॉफीची बाधा झालेली आहे.
९० टक्के अपंग ठरवलं
विशेष म्हणजे हात आणि पायावर परिणाम झालेल्यांना प्रशासकीय सेवेतमध्ये सामावून घेतलं जातं, पण मस्कुलर डिस्ट्रॉफीबाबत तसं करण्यात आलेलं नाही. मेडिकल बोर्डाने त्यांना प्रशासकीय सेवेतील पदांसाठी असक्षम ठरवलं आहे. कार्तिक यांचं मूळ अपंगत्व प्रमाणपत्र त्यांना ६० टक्के अपंग ठरवतं, तर AIIMS च्या मेडिकल बोर्डाने त्यांना ९० टक्के अपंग ठरवलं आहे.
CAT मध्ये आपली केस IAS पूजा खेडकरच्या कारनाम्यांचं सत्र सुरुच! दिव्यांग प्रमाणपत्रासाठी चक्क पत्ते बदलले
निवृत्त आयएएस अधिकारी संजीव गुप्ता यांनी कार्तिक यांना पाठिंबा देणारं ट्विट केल आहे. यूपीएससीने कार्तिक यांच्यासोबत न्याय केला नाही असं ते म्हणाले आहेत. कार्तिक यांनी कोणाच्याही मदतीशिवाय यूपीएससीची परीक्षा दिली आहे. फक्त त्यांना टॉयलेटला जाण्यासाठी मदत घ्यावी लागली. याशिवाय ते आयएएस आणि आयआरएस पदासाठी लागणारे सर्व निकष पूर्ण करतात. कार्तिक हे सध्या सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनल (CAT) मध्ये आपली केस लढत आहेत.