IAS पूजा खेडकरच्या कारनाम्यांचं सत्र सुरुच! दिव्यांग प्रमाणपत्रासाठी चक्क पत्ते बदलले…

IAS पूजा खेडकरच्या कारनाम्यांचं सत्र सुरुच! दिव्यांग प्रमाणपत्रासाठी चक्क पत्ते बदलले…

IAS Pooja Khedkar : मागील काही दिवसांपासून देशभरात आयएएस पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे. लाल दिवा ते चेंबरवर डल्ला मारल्यापासून त्यांच्या करारनाम्याला सुरुवात झाली होती. त्यानंतर अपंगाचं खोटं प्रमाणपत्र, ओबीसी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आईची दमदाटी असे अनेक कारनामे उघड झाले. त्यानंतर आता अपंगाच्या प्रमाणपत्रासाठी पूजाने आपले पत्तेच बदलल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आयएएस होण्यासाठी पूजाने केलेल्या पराक्रमाची देशभरात चर्चा सुरु आहे.

‘निलेश लंकेंना संधी देण्यात माझाच पुढाकार’; अजितदादांनी सांगितली इनसाईड स्टोरी

आयएएस बनण्यासाठी पूजा खेडकर हिने दिव्यांगांसाठी असलेल्या राखीव कोट्याचा उपयोग केलायं.त्यासाठी आवश्यक असलेलं वैद्यकीय प्रमाणपक्ष मिळवण्यासाठी तिने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील रुग्णालयात प्रयत्न केल्याचं समोर आलं. यासाठी तिने वेगवेगळे पत्ते दिल्याचं समोर आलंय. तिने अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील मूळ गावाच्या पत्त्याचा उपयोग करुन सिव्हील हॉस्पिटलमधून दोनवेळा दिव्यांग असलेलं प्रमाणपत्र मिळवलंय. 2018 साली तिला मेंटल डिसॅब्लिटी असल्याचं नमूद करण्यात आलं तर 2021 च्या प्रमाणपत्रात तिला दृष्टीहीन असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलंय.

यूपीएससीचे सर्व प्रयत्न संपल्यानंतर पूजा खेडकर यांनी नाव बदलून परीक्षा दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी तब्बल ११ वेळा परीक्षा दिली आहे. खेडकर पूजा दिलीपराव या नावाने त्यांनी २०२०-२१ पर्यंत परीक्षा दिली. त्यानंतर २०२१-२२ मध्ये त्यांनी आपल्या नावात बदल केला आणि परीक्षा दिली आहे. त्यांनी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव बदलून प्रयत्न संपल्यानंतरही दोनवेळा परीक्षा दिली आहे. सर्वसामान्यपणे पूजा खेडकर यांना ओबीसी कोट्यातून ९ वेळा परीक्षा देता येत होती. पण, त्यांनी नावात बदल करून तब्बल ११ वेळा परीक्षा दिली असल्याचं उघड झालं आहे.

विशाळगडावर जो हिंसाचार झाला त्याचा मी निषेध करतो; शाहू महाराजांनी संभाजीराजेंचे कान टोचले

या सर्व प्रकरणांची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. दरम्यान, पीएमओने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणातील सर्व अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पुजा खेडकर यांना यूपीएससी परीक्षेत मुलाखतीत महाराष्ट्रासंदर्भातील प्रश्नांची उत्तरं देता आली नव्हती. तसंच, या परीक्षेसाठी दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र आणि उत्पन्न जास्त असताना घेतलेलं क्रिमिलेअर प्रमाणपत्र या सर्व प्रकाराची माहिती माध्यमांमधून समोर येत आहे. त्याची दखल आता पीएमओने घेतली आहे. दरम्यान, पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पाठवावा असे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधान कार्यालयाने दिला आहे. थेट पीएमओ कार्यालयाने अहवाल मागवल्याने आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube