तुरुंगातही मनोरमा खेडकरचा तोरा कायम; चॉकलेट्स अन् बऱ्याच गोष्टींची पोलिसांकडं मागणी

तुरुंगातही मनोरमा खेडकरचा तोरा कायम; चॉकलेट्स अन् बऱ्याच गोष्टींची पोलिसांकडं मागणी

Manorama Khedkar : देशात गेल्या काही दिवसांपासून आयएएस पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांचे प्रकरण गाजत आहे. दरम्यान केंद्र सरकारने पूजा खेडकरच्या गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. तर मुळशीतील शेतकऱ्यांना पिस्तूलाचा धाक दाखवत धमकी देणाऱ्या पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) सध्या तुरुंगात आहेत. दरम्यान, तुरुंगाबाहेर असताना मिजास करणाऱ्या मनोरमा खेडकर यांची ही मिजास तुरुंगात गेल्यानंतरही संपली नाही. कारण तुरुंगात मनोरामा खेडकर यांनी अवास्तव मागण्या करत पोलिसांना हैराण करून सोडलं आहे.

अंघोळीसाठी गरम पाणी MCA: अजिंक्य नाईक एमसीएचे अध्यक्ष, संजय नाईकांचा पराभव करत आशिष शेलारांना दिला धक्का

मनोरमा खेडकर यांनी तुरुंगातील पोलिसांकडे चॉकलेट्स आणि फळांची मागणी केली आहे. यासह खेडकरांनी अंघोळीसाठी गरम पाणी आणि इतर कैद्यांना असलेले जेवन नाकारले आहे. बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा खेडकर फरार झाल्या होत्या. पोलिसांना चकवा देत त्या इकडेतिकडे लपत होत्या. अखेर त्या महाड येथील हिरकरणीवाडीमधील पार्वती निवास हॉटेलमध्ये जाऊन लपल्या, तेथे राहण्यासाठी त्यांनी खोट्या नावाने रूम बुक केली होती. कॅब ड्रायव्हर दादासाहेब ढाकणे यांच्या आधार कार्डचा मनोरमा खेडकर यांनी गैरवापर केला आहे. पोलिस त्यांचा सर्वत्र शोध घेत त्यांना अटक केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube