IAS पूजा खेडकर नॉट रिचेबल? पोलिसांकडून शोध सुरु; मसुरीत हजर होण्याचा अंतिम दिवस

IAS पूजा खेडकर नॉट रिचेबल? पोलिसांकडून शोध सुरु; मसुरीत हजर होण्याचा अंतिम दिवस

पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. याबाबत लेट्सअप मराठीने खात्री केलेली नाही, मात्र पुणे आणि दिल्ली पोलील खेडकर यांचा शोध घेत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. खेडकर यांना मसुरी येथेील लाल बहाद्दूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीमध्ये हजर होण्याचा आजचा (23 जुलै) अंतिम दिवस आहे. मात्र अद्यापही त्या तिथे हजर झालेल्या नाहीत. त्यामुळे खेडकर तिकडे तरी हजर होणार का? हा प्रश्न कायम आहे. (Controversial IAS Officer Pooja Khedkar Not Reachable)

पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात छळाची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात खेडकर यांचा जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांनी त्यांना दोनवेळा समन्स बजावले होते. मात्र त्या हजर राहिल्या नव्हता. या दरम्यान,  केंद्रीय लोकसेवा आयोगानेही खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाव बदलून परीक्षा देणे, आयोगाची फसवणूक करणे अशा आरोपांवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय तुमची निवडच का रद्द करु नये, याबाबत उत्तर देण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

‘हाययेस्ट वेड लावणारा अभिनेता असणे माझ्यासाठी महत्वाचे’, अभिनेता प्रसाद ओक असं का म्हणाला?

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर कार्यालयात राजेशाही वागण्यापासून ते बोगस अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचे विविध आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणी पंतप्रधान कार्यालय, कार्मिक मंत्रालय, केंद्रीय लोकसेवा आयोग, मसुरी येथील लाल बहाद्दूर शास्त्री अकादमी अशा सर्वांनी अहवाल मागविला होता. यापूर्वी राज्य शासनाने सादर केलेल्या सविस्तर अहवालाच्या आधारे लाल बहाद्दूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने परत बोलावून घेतले आहे. 23 जुलैपर्यंत त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य शासनानेही त्यांना तातडीने कार्यमुक्त केले आहे.

पुण्यात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजु झालेल्या पूजा खेडकर यांना युपीएससी परिक्षेत 821 वी रँक मिळाली होती. त्यानंतरही त्यांना आयएएस केडर मिळाले. यासाठी त्यांनी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप केला जात आहे. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून खेडकर यांनी दृष्टीहीन असून दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळवले होते. यासोबतच त्यांची निवड ओबीसी प्रवर्गातून झाली होती. यासाठी वडिलांचं उत्पन्न 40 लाखांपेक्षा अधिक असूनही नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

बिहारचंही गुडलक! रस्ते अन् पायाभूत सुविधांसाठी निधीचा वर्षाव; अर्थमंत्र्यांची घोषणा

पूजा खेडकर यांनी अपंग प्रमाणपत्रासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रयत्न केले. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून दिव्यांग असल्याच्या प्रमाणपत्रासाठी त्यांनी पाथर्डी तालुक्यातील भालगावचा पत्ता सादर केला होता. तर दुसरीकडे पुण्यातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून अपंग प्रमाणपत्रासाठी पिंपरी चिंचवडचा पत्ता दिला होता. पिंपरी चिंचवड परिसरातील त्यांच्या पत्त्यावर आई मनोरमा खेडकर यांची कंपनीस्थित आहे. ही कंपनीदेखील अनधिकृत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube