‘हाययेस्ट वेड लावणारा अभिनेता असणे माझ्यासाठी महत्वाचे’, अभिनेता प्रसाद ओक असं का म्हणाला?

Prasad Oak: सध्या सोशल मीडियाव चर्चा आहे ती म्हणजे 'धर्मवीर 2' या चित्रपटाची. अभिनेता प्रसाद ओकच्या अभिनयाचं पहिल्या भागापासून कौतुक केलं जात आहे.

  • Written By: Published:
‘हाययेस्ट वेड लावणारा अभिनेता असणे माझ्यासाठी महत्वाचे’

Prasad Oak Dharmaveer 2 Movie: सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चा आहे ती म्हणजे ‘धर्मवीर 2’ (Dharmaveer 2) या चित्रपटाची. अभिनेता प्रसाद ओकच्या (Prasad Oak) अभिनयाचं पहिल्या भागापासून कौतुक केलं जात आहे तर दुसऱ्या भागात देखील प्रसादचा अभिनय पाहून ट्रेलर लॉन्च सोहळ्याला (Dharmaveer 2 Trailer) उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी देखील त्याचं कौतुक केलं.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यात यशस्वी ठरला होता. चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर आता या ‘धर्मवीर‘चा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे 2’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. सध्या प्रसाद ओक हा अनेक माध्यमांना मुलाखती देत आहे यातल्या एका मुलाखती मध्ये त्याने ‘हाययेस्ट पेड अभिनेता’ असण्याबद्दल एक खास गोष्ट सांगितली आहे. काय हे बघू या …

 

View this post on Instagram

 

A post shared by Aarpaar | आरपार (@aarpaar.online)


‘आरपार ऑनलाईन या पॉडकास्ट’च्या मुलाखीदरम्यान प्रसाद म्हणाला ‘हाययेस्ट पेड अभिनेता असण्यापेक्षा हाययेस्ट व्ह्यूड अभिनेता असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाच आहे. मी हाययेस्ट पेड अभिनेता आहे का हे दोन व्यक्ती ना विचारावं एक मंजिरी आणि मंगेश ही दोन लोकं याबद्दल सांगू शकतील, पण मला असं वाटतं हल्ली हाययेस्ट पेड अभिनेता असण्यापेक्षा आपण हाययेस्ट रेड ( Read ) कलाकार आहोत का आपल्या बद्दल लोक किती वाचतात किंवा हाययेस्ट वेड लावणारा अभिनेता आहे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे असं मला वाटतं.

Dharmaveer 2: साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर; CM शिंदेच्या उपस्थितीत शुटींगला सुरुवात

मराठी इंडस्ट्रीत सध्या प्रसाद ओक हा खरंच हाययेस्ट पेड कलाकार आहेत यात शंका नाही. अनेक दमदार भूमिका असो किंवा त्यांच अगदी चोखपणे केलेलं दिग्दर्शन असो किंवा अगदी हास्य जत्रे मधली त्याची मार्मिक टिपण्णी असो… प्रसाद हा बहुआयामी कलाकार आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

‘धर्मवीर 2’ नंतर प्रसाद येणाऱ्या काळात अनेक वैविध्यपूर्ण भूमिका करणार असल्याचं देखील कळतंय. हिंदी मराठीच्या सोबतीने प्रसाद कोणत्या वेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

follow us