UPSC ला मला अपात्र ठरवण्याचा अधिकार नाही: पूजा खेडकरकडून आरोपांचे खंडन

  • Written By: Published:
UPSC ला मला अपात्र ठरवण्याचा अधिकार नाही: पूजा खेडकरकडून आरोपांचे खंडन

नवी दिल्ली : UPSC ला मला अपात्र ठरवण्याचा अधिकार नाही असे म्हणत माजी  IAS अधिकारी पूजा खेडकरने (Puja Khedkar) केंद्रीय लोकसेवा आयोगाने लावलेले सर्व फसवणुकीचे आरोपांचे फोटाळून लावले आहेत. पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या रिजॅाईंडरमध्ये पूजा खेडकरने सर्व आरोप फेटाळूून लावले आहेत. (UPSC Has No Power To Disqualify me Says Puja Khedkar)

खेडकर प्रकरणानंतर सरकारला आली जाग; दिव्यांगांबाबतचा कठोर GR निघाला

पुजा खेडकरच्या रिजॅाईंडरमध्ये काय?

केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक करून IAS बनलेल्या पूजा खेडकरची उमेदवारी आयोगाकडून तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. पूजा खेडकरनं नाव बदलून फसवणूक केल्याचा आरोप युपीएससीनं केला होता. याला प्रत्युत्तर देताना आता पुजा खेडकरने युपीएससीच्या आरोपात तथ्य नसून UPSC ला मला अपात्र ठरवण्याचा अधिकार नसल्याचे पुजाने रिजॅाईंडरमध्ये म्हटले आहे. नाव बदलल्याची माहिती यापूर्वीच युपीएससीकडे दिली असल्याचं स्पष्टीकरणही पूजा खेडकरने दिले आहे.

आता फक्त DoPT चं माझ्यावर कारवाई करू शकते

एकदा प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड आणि नियुक्ती केल्यानंतर उमेदवाराला अपात्र ठरवण्याचा यूपीएससीचा अधिकार संपतो. आता फक्त केंद्र सरकारचा कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) आपल्यावर कारवाई करू शकतो असे पूजा खेडकर यांनी न्यायालयात सांगितले आहे. या प्रकरणावर उद्या पुन्हा दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार असून, पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मिळणार की फेटाळला जाणार यावर काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

केंद्राचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; पुण्याजवळील दिघीचं रुपडं पालटणार; वाचा मंत्रिमंडळातील मोठे निर्णय

उमेदवारी तात्पुरती रद्द 

नागरी सेवा परीक्षा-2022 या नुसार नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 31 जुलै रोजी UPSC ने पुजा खेडकरची तात्पुरती उमेदवारी रद्द केली एवढेच नव्हे तर, पूजा खेडकर यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीवरही बंदी घातली आहे. यूपीएससीने पूजा खेडकर यांच्या 2009 ते 2023 या काळातील सर्व रेकॉर्ड तपासल्यानंतर ही कारवाई केली आहे. पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचे उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने ही कारवाई केली होती. पूजा खेडकर या 2023 बॅचच्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी होत्या. नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये त्यांनी 841 वा क्रमांक मिळविला. त्यानंतर जून 2024 पासून मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरू होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube