बिहारचंही गुडलक! रस्ते अन् पायाभूत सुविधांसाठी निधीचा वर्षाव; अर्थमंत्र्यांची घोषणा
Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज संसदेत बजेट (Budget 2024) सादर केलं. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचं (NDA Government) हे पहिलंच बजेट होतं. त्यामुळे देशातील जनतेबरोबरच सरकारमधील घटक पक्षांचंही बजेटकडे (Bihar News) लक्ष होतं. सरकारने ज्या प्रमाणे आंध्र प्रदेशला विशेष (Andhra Pradesh) पॅकेज देत खूश करण्याचा प्रयत्न केला. तसाच प्रयत्न बिहारसाठीही केला आहे. अर्थमंत्री सितारमण यांनी (Nirmala Sitharaman) बिहार राज्यातील रस्ते प्रकल्पांसाठी 26 हजार कोटी रुपयांचं खास पॅकेज जाहीर केलं. या पॅकेजच्या माध्यमातून बिहारच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. बिहारमधील सत्ताधारी जेडीयूकडून बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली जात होती. मात्र ही मागणी बाजूला ठेवत आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
Union Budget : सातव्यांदा बजेट मांडून रचणार इतिहास; सितारमण तोडणार ‘या’ नेत्याचं रेकॉर्ड
बिहार राज्यासाठी अर्थमंत्री सितारमण यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये बिहारमध्ये 3 एक्सप्रेसवेची घोषणा. बोधगया-वैशाली द्रुतगती मार्गाचे बांधकाम. पाटणा-पूर्णिया एक्स्प्रेस वेचे बांधकाम. बक्सरमध्ये गंगा नदीवर दुपदरी पूल. बिहारमध्ये 21 हजार कोटी रुपयांच्या पॉवर प्लांटचीही घोषणा तसेच बिहारमध्ये नवे विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार असल्याचे सितारमण यांनी सांगितले.
बिहारमधील महाबोधी मंदीराच्या विकासासाठी विशेष निधी देण्यात येणार आहे. तसेच काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर बिहारमध्येही मंदिरांचा विकास करण्यात येणार आहे. राजगया मंदिराचाही विकास आगामी काळात होणार आहे. नालंदा विद्यापाठीसाठी विशेष निधी सरकारकडून देण्यात येईल. तसेच बिहारसाठी 20 ते 21 पाणी आणि सिंचनाच्या योजना नव्याने राबवण्यात येतील, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी भाषणात केली.
पाठिंबा दिलाय मागणी करणारच! PM मोदींच्या भेटीत नायडूंची मोठ्ठी लिस्ट; गडकरींवरही दबाव
राज्यांना विशेष दर्जा देण्याची मागणी
संसदेचं अधिवेशन सुरू होताच आंध्र प्रदेश, बिहार आणि ओडिशा (Odisha) या राज्यांना विशेष राज्यांचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आली. ऑल पार्टी मीटिंगमध्ये जेडीयू, आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस आणि ओडिशातील बिजू जनता दलाने ही मागणी केली. काँग्रेस नेते (Congress party) जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या मुद्द्यावर टीडीपी गप्प का आहे असा खोचक टोला लगावला होता. सरकारचं कामकाज सुरू झालेलं असताना विरोधी पक्ष त्यातही काँग्रेसच्या नेत्यांकडून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत.