शरद पवार राजकारणाचे देव आहेत, त्यांची महाराष्ट्राला असून ते नसतील तर दुर्देव असल्याचं शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राजकारणातून निवृत्ती व्हायचंय, अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीसह इतर पक्षाच्या नेत्यांकडून त्यांची महाराष्ट्राला गरज असून निवृत्ती घेऊ नये, असं आवाहन करण्यात येत आहे.
आणखी एक विमान कंपनी दिवाळखोरीत! रोकड संपल्याने सर्व उड्डाणे रद्द
आमदार कांदे म्हणाले, शरद पवार हे राजकारणाचे देव म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्यासारख्या व्यक्तीची महाराष्ट्राला गरज आहे, त्यामुळे ते राजकारणात नसतील तर हे दुर्देव आहे. त्यांनी निवृत्ती घेऊ नये अशी आमच्या पक्षाच्यावतीने मी विनंती करीत असल्याचंही ते म्हणाले आहेत.
तसेच एका सामान्य आणि शेतकरी कुटुंबातला माणूस देशाचं राजकारण करत असेल तर त्यांना पाहुनच आम्ही राजकारणात उतरलो, असं म्हटलं तरी वावगं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, जर शरद पवारांनी निवृत्ती घेतली तर त्यापुढील राजकारण कसं असेल यावर त्यांनी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा वैयक्तिक विषय असून त्यावर आमदार कांदे यांनी बोलणं टाळलं आहे.
शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. पवारांच्या अचानक या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह दुसऱ्या फळीतील नेते, युवक कार्यकर्त्यांनी केली आहे.
शरद पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. काही कार्यकर्त्यांनी तर उपोषण केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यानंतर शरद पवारांना राजीनाम्यावर विचार करण्यासाठी दोन ते तीन दिवस द्या, असा निरोप कार्यकर्त्यांना दिला आहे.