Download App

रोहित पवार स्वत: BJPमध्ये जाऊन मंत्रीपद मिळण्यासाठी उत्सुक..; अजितदादा गटाच्या आमदाराचा दावा

रोहित पवार स्वत: भाजपमध्ये जाऊन मंत्रीपद मिळवण्यासाठी उत्सुक असल्याचं विधान आमदार प्रकाश सोळंकेंनी केलं आहे.

MLA Prakash Solanke On Rohit Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तब्बल 18 ते 19 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर आता अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंनी (MLA Prakash Solanke) मोठा दावा केला आहे. रोहित पवा स्वत: भाजपमध्ये जाऊन मंत्रीपद मिळवण्यासाठी उत्सुक असल्याचं विधान सोळंकेंनी केलं.

‘यूपी’तील फोडाफोडी भाजपाच्या अंगलट; राज्यसभेचं गणित लोकसभेला जुळलंच नाही 

प्रकाश सोळंके यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला पाच आमदारांनी दांडी मारली होती. त्यानंतर रोहित पवार, जयंत पाटील या नेत्यांना अजित पवार गटाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं विधान केलं होतं. त्याविषयी सोळंकेंना विचारले असता ते म्हणाले, जो दावा केला जात आहे तो एक प्रकारचा प्रचाराचा भाग आहे, असं सोळंके म्हणाले.

‘यूपी’तील फोडाफोडी भाजपाच्या अंगलट; राज्यसभेचं गणित लोकसभेला जुळलंच नाही 

पुढं ते म्हणाले, परवा आमची बैठ झाली आहे. त्यामुळं अजित पवार गटातील कोणताही आमदार सोडून तिकडे जायला तयार नाही. याउलट रोहित पवार स्वतः भाजपमध्ये जाऊन मंत्रीपद मिळविण्यासाठी उत्सक आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा भेटीगाठी घेतल्या आहेत, दावा सोळंकेंनी केला.

ते पुढे म्हणाले, बीडमध्ये बजरंग सोनवणे यांचा विजय हा राष्ट्रवादी पक्षामुळं झाल्याचं मी समजत नाही. तर मराठा आरक्षण, मुस्लिम मते आणि दलितांची नाराजी ही सोनवणे यांच्या विजयाची कारणे होती. पण विधानसभेत असे होणार नाही. जो घटक नाराज आहे, त्याला आम्ही निश्चितपणे सोबत घेण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास सोळंकेंनी व्यक्त केला.

तर आमच्यासारखे कंरटे आम्हीच – कोकाटे
सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनीही रोहित पवार यांचा दावा फेटाळून लावला आहे. अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्यासारखे कंरटे आम्हीच असू. आमचा एकही आमदार अजित पवारांना सोडून जाणार नाही. अजितदादांना सोडून जाण्यासाठी एक तरी कारणं हवं… रोहित पवार यांचा दावा हा संभ्रम निर्माण करण्यासाठी केला गेला, असं कोकाटे म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज