Download App

‘सुप्रिया सुळेंचा बारामतीत पराभव निश्चित, दुसरा मतदारसंघ शोधावा’

  • Written By: Last Updated:

Mla Ram Shinde On Baramati Loksabha : बारामती लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे. या मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते, केंद्रीय, राज्यातील मंत्री सातत्याने मतदारसंघात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसला घेरत आहे. या मतदारसंघाची जबाबदारी असलेले आमदार राम शिंदे यांनी एक मोठे विधान केले आहे. सुप्रिया सुळे यांचा पराभव निश्चितपणे होणार आहे. त्यामुळे त्यांनी दुसरा मतदारसंघ शोधावा, असा इशाराच आमदार राम शिंदे यांनी सुळे यांना दिला आहे.

लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर बारामती लोकसभा जिंकण्याबाबत राम शिंदे म्हणाले, बारामती लोकसभेची जबाबदारी माझ्याकडे आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे या पाच वर्षाने निवडणुकीच्या वेळीच मतदारसंघात फिरतात, असे मतदारसंघातील जनताच सांगत आहे.


गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच विकास केला आहे. भाजपचे नेते मतदारसंघात फिरू लागल्याने सुप्रिया सुळेही आठ दिवसाला मतदारसंघात फिरायला लागल्या आहेत. त्यांच्यात मनात भीती निर्माण झाली असून, त्यांना पराजय दिसू लागला असल्याचा दावाही राम शिंदे यांनी केला आहे.

ए फॉर अमेठी, तर बी फॉर बारामती आमची घोषणाच आहे. अमेठी आम्ही जिंकू शकतो. तर बारामती आम्ही जिंकू शकतो, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांना अमेठी व वायनाड या दोन मतदारसंघात उभे रहावे लागले. बारामतीकरांना वायनाड ही सापडणार नाही. त्याच्या पक्ष केवळ तीन ते साडेतीन जिल्ह्यात राहिला आहे, असा टोलाही शिंदे यांनी लगावला आहे.

आशिष देशमुखांना काँग्रेसकडून तीन दिवसांचं अल्टिमेटम…

कुल की हर्षवर्धन पाटील
या मतदारसंघासाठी आमदार राहुल कुल, हर्षवर्धन पाटील यांचे नावे चर्चेत आहेत. आमदार राम शिंदे हे उमेदवाराबाबत मात्र स्पष्ट बोलले नाहीत. पक्ष पातळीवर निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र्य टीम काम करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.

Tags

follow us