Download App

2019 पैसे घेऊन उमेदवारी, बाळासाहेब असते तर उलटं टांगलं असतं; आमदार बोरनारेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Ramesh Bornare on Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) वैजापूरच्या सभेत शिंदे गट आणि स्थानिक आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्यावर सडकून टीका केली होती. 40 आमदारांनी पक्षाशी गद्दारी करून महाराष्ट्राच्या (Maharashtra) मातीला गद्दारीचा कलंक लावला. वैजापूरच्या आमदाराने या भूमीलाही कलंक लावल्याची टीका त्यांनी केली. त्यांच्या या टीकेला आता बोरनारे यांनी प्रत्युतर दिलं.

केंद्रीय मंत्रीमंडळानं ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ला दिली मंजूरी ! 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पैसे घेऊन उमेदवारी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बोरनारे यांनी केला.

रमेश बोरनारे यांनी आज वैजापुरात सभा घेतली. या सभेत बोलतांना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. बोरनारे म्हणाले, 2019 च्या निवडणुकीत वैजापूर विधानसभेची उमेदवारी देत असतांना पैशाचा वापर होत होता. पैसे घेऊन वैजापूरची उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला गेला. एका माणसाला बळजबरीने पैशांच्या बदल्यात उमेदवारी दिली जाणार होती. त्यांनी उमेदवारी विकण्याचा घाट घातला होता आणि काल ते वैजापुरात येऊन माझ्यावर टीका करून गेले, असं बोरनारे म्हणाले.

पुण्यात 26 वर्षीय मुलीचं निधन; कामाला झोकून दिलेल्यांची झोप उडवणारं आईचं पत्र वाचलंत का? 

बोरनारे म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणाले की – रमेश बोरनारेला उलटं टांगलं असतं. मात्र, मी  जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते आणि त्यांनी तुम्हाला काँग्रेससोबत आघाडी करतांना पाहिलं असतं तर  उलटं टांगलं असते.

आमदार बोरनारे म्हणाले, माजी मुख्यमंत्र्यांचा तोल ढासळला गेला. त्यामुळंच एका आमदारावर टीका करू लागले आहेत. ते त्यांना शोभत नाही. आम्हाला वाटलेलं वैजापूरला आल्यावर ते एखाद्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील. पण ते आले आणि फक्त टीका करून गेले.

मला एवढेच सांगायचे आहे की, गेल्या निवडणुकीत मला उमेदवारी सहजासहजी मिळाली नाही. ते शेवटच्या क्षणी पैसे देणाऱ्याला तिकीट देणार होते. पण मी त्यांना भेटलो आणि सांगितलं की, गेल्या 25 वर्षात मी शिवसेनेसाठी किती काम केलं आहे. मी त्यांना आजवर केलेल्या कामांची माहिती दिली. मी त्यांना म्हटलं की, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिकीट दिले नाही तर शिवसैनिक आत्महत्या करतील, असं बोरनारे म्हणाले.

follow us