Rohit Pawar News : मी पदासाठी कधीही लढत नाही, मविआमध्ये पवारांचा नातू असूनही मंत्री नव्हतो, आमदारच होतो, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी विरोधकांना सुनावलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आता रोहित पवार अजितदादांची जागा घेऊ पाहत असल्याची टीका अजित पवार गटाकडून करण्यात आली. या टीकेवर रोहित पवारांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. सांगलीतल्या संघर्ष यात्रेदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
पक्षाकडून साईड लाईन झाल्यानंतरही मध्यप्रदेशात बाजीगर ठरले मामांजी; असा जिंकला गड
रोहित पवार म्हणाले, मी पदासाठी कधी लढत नाही. महाविकास आघाडीत पवारांचा नातू असूनही मंत्री नव्हतो आमदारच होतो. पवार आडनावाचा मी कधी वापर नाही केला ज्यांनी मंत्रिपद मिळवली त्यांना विचारु शकता. काही नेते आधी राजकारणात आले नंतर व्यवसायात आले.(अजितदादांवर बोलत नाही) व्यवसायाच्या दृष्टीकोनातून त्यांना संघर्ष करावा लागला नाही पण मला व्यवसायातून राजकारणात यायला संघर्ष करावा लागला, असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना लगावला आहे.
Assembly Election 2023: भाजपने सेमीफायनल जिंकली ! मोदींचा ‘मिशन 2024’चा रोडमॅप क्लिअर कसा झाला ?
यावेळी बोलताना रोहित पवार यांनी देशातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालावरही भाष्य केलं आहे. ज्या राज्यांत काँग्रेसकडून प्रयोग झाला, नेतृत्वात बदल झाला, नवीन चेहरे दिले तिथं यश आलं पण तिथं टीपिकल स्टाईलने काँग्रेसने लढण्याच प्रयत्न केला तिथं पराजय झाला असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. दक्षिणेत काँग्रेसच आहे. भाजप संप्रदाय राज्यातील वारकरी संप्रदायाला चॅलेंज करीत आहेत. मध्य प्रदेशातून काही गट महाराष्ट्रात येत आहेत. वारकरी संप्रदायाला वेगळा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करताहेत. मध्य प्रदेशात केलेला प्रयोग राज्यात केला जात असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी यावेळी केला आहे.
आयुष्यात कधी संघर्ष केला नाही तेच संघर्षयात्रा काढत असल्याची जहरी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांच्यावर केली होती. तसेच स्वत:च्या अस्तित्वाची चिंता म्हणूनच संघर्षयात्रा काढत असल्याचं म्हणत रुपाली चाकणकर यांनी आमदार रोहित पवारांवर निशाणा साधला. कर्जतमधील खालापूर येथे आयोजित केलेल्या विचार मंथन शिबिरात अजित पवार गटाने रोहित पवारांवर टीका केली होती.