Rohit Pawar on Dhananjay Munde : परळी तालुक्यात गोळीबाराची घटना झाल्यानंतर येथील राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी वारंवार प्रश्न उपस्थित करत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष केलं आहे. रोहित पवार म्हणाले, परळीत धनंजय मुंडेंचे (Dhananjay Munde )मास्टरमाईंड आहेत. परंतु, वाल्मिक कराड नावाचा त्यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आमदार असले तरी त्यांच्या मतदारसंघात त्यांचे काहीच चालच नाही, तिथे सर्व दहशत ही वाल्मिक कराडची (Valmik Karad) आहे असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
अखेर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवेंचं निलंबन मागे, शिवीगाळ प्रकरणात झाली होती कारवाई
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन्ही मोठे नेते आहेत. त्याचबरोबर परळची जनता अतिशय साधी आणि प्रामाणिक आहे. परंतु, या भागात वाल्मिक कराड व्यक्तितीची भागात मोठी गुंडागर्दी आहे. तो कोणालााही जुमानत नाही. परळी जरी आमदार धनंजय मुंडेंची असली तरी त्यांचे त्या मतदारसंघात काहीच चालत नाही असा थेटं गंभीर आरोपच रोहित पवार यांनी केला आहे. छोट्या मोठ्या व्यवसायिकांना त्रास दिला जातो. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला जातो. वाल्मिक कराड यंत्रणेचा गैर वापर करतात. कराड यांची दहशत आता धनंजय मुंडे यांच्या हाताबाहेर गेली असा थेट आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
परळी शहरांमध्ये गोळीबारामध्ये एक जण जागीच ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झालेत. परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला. या गोळीबारामध्ये मरळ वाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते जखमी आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत जखमीवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत. मृत झालेले बापू आंधळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काम करत आहेत. त्यासोबतच जखमी झालेले ज्ञानबा गीते हे सुद्धा धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत. तर, तिसरे जखमी महादेव गीते हे बबन गीते जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांचे समर्थक आहेत. त्यानंतर वारंवार रोहित पवार धनंजय मुंडे यांना लक्ष करत आहेत. वाल्मिक कराडवर दिलेली त्यांची प्रतिक्रियाही याच प्रकरणाच भाग आहे.