बैल कसा नेतो तेच बघतो म्हणत थेट गोळीबार; उपचारादरम्यान रणजित निंबाळकरांचा मृत्यू
Pune Crime : बारामती तालुक्यातील निंबुत येथे (Pune Crime) बैलाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात वाद होऊन रणजित निंबाळकर यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. ही थरारक घटना गुरुवारी रात्री घडली. गोळीबारात जखमी (Baramati News) झालेल्या निंबाळकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली. पुढे त्यांची प्रकृती खालावल्याने पुणे शहरातील (Pune City) खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान आज शनिवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी रणजित यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून गौतम शहाजीराव काकडे, गौरव शहाजीराव काकडे आणि अन्य तीन अनोळखी तरुणांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मात्र रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल होणार असल्याचे समजते.
पुणे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा; सभागृहात फडणवीसांनी दिली A टू Z माहिती
बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात रणजित निंबाळकर अल्पावधीतच नावारुपास आले होते. बैलगाडा संघटनेचे नेते मानले गेलेले गौतम काकडे यांचा सर्जा हा बैल त्यांनी 61 लाख रुपयांनी विकत घेतला होता. त्यांच्याकडे सुंदर नावाचा आणखी एक बैल होता. त्यामुळे रणजित निंबाळकर अल्पावधीत बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात सर या नावाने ओळखले जात होते.
त्यांचा हाच सुंदर नावाचा बैल खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू होता. हा बैल खरेदी करण्यासाठी सोमवारी गौतम काकडे आणि संतोष तोडकर दोघे रणजित निंबाळकर यांच्याकडे गेले होते. त्यानंतर पाच लाख रुपये इसार देऊन दोघेजण हा बैल निंबुतला घेऊन आले होते. व्यवहारात ठरल्यानुसार राहिलेले 32 लाख रुपये घेण्यासाठी निंबाळकर निंबुतला गेले होते. पण त्यांना पैसे काही मिळाले नाहीत. त्यानंतर गुरुवारी रात्री अकरा वाजता पैसे देतो असे सांगून त्यांना परत बोलावले.
त्यानंतर रणजित आपल्या कुटुंबासह चारचाकीतून गौतम यांच्या घरी गेले. तेथे गौतमने मी तुम्हाला सकाळी पैसे देतो पण आता सही करा असे सांगितले. यावर रणजित निंबाळकर यांनी स्पष्ट नकार देत आता पूर्ण पैसे द्या नाहीतर मी इसार परत देतो. माझा बैल मला परत द्या असे सांगितले. वाद वाढल्यानंतर गौरव काकडे आणि काहीजण तेथे आले. रणजित यांच्यावर काठी उगारत त्यांना शिवीगाळही करण्यात आली. बैल कसा नेतो तेच बघतो असे म्हणत रणजित यांच्यावर गोळीबार करण्यात आला असे फिर्यादीत म्हटले आहे.
पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरण : मृत मुलांच्या पालकांना 10 लाखांची मदत, शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन
गौतम काकडे आणि गौरव काकडे सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष शहाजी काकडे यांची मुले आहेत. शहाजीराव काकडे यांच्या नावाने पिस्तुलाचा परवाना असल्याने पोलिसांनी त्यांनाही अटक केली होती. यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गौतम काकडे मात्र फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.