पुणे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा; सभागृहात फडणवीसांनी दिली A टू Z माहिती

पुणे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा; सभागृहात फडणवीसांनी दिली A टू Z माहिती

Fadnavis Comment on Porsche cars Accident in Assembly : राज्य विधिमंडळात पुणे हिट अँड रन प्रकरणात पहिलीच लक्षवेधी मांडण्यात आली. या लक्षवेधीवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात खडाजंगी झाली. (Pune Accident) (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला अपघाताची सविस्तर माहिती देत अल्पवयीन आरोपीला पहाटं तीन वाजता पोलीस ठाण्यात आणलं. मात्र, त्याला मेडिकलसाठी आठ वाजता नेलं येथे पोलिसांचं चुकलं, अशी विधानसभेत बोलताना जाहीर कबुली दिली. (Pune Car Accident) दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती देताना आरोपीवर 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच, दोषी पोलिसांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली असल्याचंही सांगितलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? धक्कादायक! वाळू माफियांवर मंत्र्यांचं अजब उत्तर, थोरात-विखे पाटीलांची सभागृहात खडाजंगी

देवेंद्र फडणवीसांनी यावेळी घटना घडली तेव्हापासूनचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. “हा मुद्दा नक्कीच गंभीर आहे. ही घटना १९ मे २०२४ रोजी रात्री अडीचच्या सुमारास घडली. त्यानंतर त्या मुलाला लोकांनी थोडी मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलीस स्थानकात आणलं. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. हे खरं आहे की पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो कलम ( ३०४ अ) होता. पण त्यानंतर वरिष्ठांनी भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की (३०४ अ) नव्हे, (३०४) चाच गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यामुळे त्याच दिवशी केस डायरीमध्ये ३०४ चा गुन्हा दाखल केला अशी माहिती फडणवीसांनी दिली.

न्यायालयाकडे वर्ग करावं

ज्युवेनाईल जस्टिस बोर्डासमोर दाखल अर्जात स्पष्टपणे बाजू मांडण्यात आली आहे. ‘संबंधित मुलाचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं निष्पन्न झालं असून त्यानं निघृणपणे सदरचं कृत्य केलं आहे. त्याची जन्मतारीख १४ सप्टेंबर २००६ असून त्याचं वय १७ वर्षं ८ महिने इतकं झालं आहे. त्याच्या वयाचा विचार करता त्याला प्रौढ समजून ते न्यायालयाकडे वर्ग करावं अशी विनंती करण्यात आली आहे, असं पोलिसांनी त्या अर्जात म्हटलं असल्याचंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

जुना निर्णय बदलला अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; संयमी नेते बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक

निर्भयाच्या घटनेनंतर १७ वर्षांच्या वरचे जे आहेत आणि थंड डोक्याने त्यांनी एखादं कृत्य केल्याचं लक्षात आलं तर त्यांना प्रौढ मानता येतं याबाबतची तरतूद आहे. त्यानुसारच ही मागणी करण्यात आली होती. त्या बोर्डाच्या सदस्यांनी तो अर्ज दाखल करून घेतला. त्यानंतर त्याला काय शिक्षा दिल्या हे सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर लगेच पोलिसांनी त्यावर अपील दाखल केली. न्यायालयाने पोलिसांना सांगितलं की तुम्हाला रिव्ह्यूचा अधिकार आहे. त्यासाठी आम्ही बोर्डाकडे याचिका दाखल केली, तेव्हा त्यांनी आपला जुना निर्णय बदलला आणि आरोपीला कोठडी दिलीय याची माहितीही फडणवीसांनी सभागृहाला दिली.

याबाबत पहिलं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. क्रॅश इम्पॅक्ट अॅनालिसिस करण्यात आलं. मुलानं जेव्हा ब्रेक मारला, तेव्हा लॉक झालेला वेग ११० किलोमीटर प्रतीतास एवढा आहे. त्यामुळे अत्यंत वेगानं तो कार चालवत होता. त्याच्या घरापासूनचं सीसीटीव्ही फूटेज जप्त करण्यात आलं आहे. तो आधी ज्या बारमध्ये बसला, जिथे दारू प्यायला त्याचं सीसीटीव्ही फूटेज जप्त करण्यात आलं आहे. दुसऱ्या बारमध्ये जिथे बसला, त्याचं सीसीटीव्ही फूटेज जप्त झालं आहे. त्यामुळे पुराव्यांमध्ये कुठेही कमतरता नाहीये असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

एक दिवस घरात कोंडूनही ठेवलं

त्याच्या वडिलांवरही कारवाई करण्यात आली आहे. वडिलांनी मुलगा प्रौढ नसताना त्याला गाडी चालवायला देणं, या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. बार चालकांवरही कारवाई झाली आहे. तसंच, त्याच्या आजोबांनी त्यांच्या ड्रायव्हरला हा गुन्हा अंगावर घेण्याची गळ घातली. पण पोलिसांनी ड्रायव्हरचं ऐकलं नाही. त्या आजोबांनी ड्रायव्हरला एक दिवस घरात कोंडूनही ठेवलं. पण त्यानं काही त्यांचं ऐकलं नाही. वडिल आणि आजोबांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. ते अजूनही अटकेत आहेत याबद्दलही फडणवीसांनी माहिती दिली.

तर परवाना रद्द TATA: टाटा ग्रुपचा ऐतिहासिक निर्णय! कंपनीमध्ये लागू होणार आरक्षण, वंचित घटकांना मिळणार न्याय

पुण्याच्या परिसरात ७० पब्जवर कारवाई करण्यात आली आहे. ज्यानी परवान्याच्या अटी-शर्थींचं उल्लंघन केलं आहे, अशा ७० पब्जचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. ज्यांचे परवाने आहेत, तिथे कॅमेरे लावले आहेत. ज्यातून त्यांनी किती वाजता पब बंद केला, गिऱ्हाइकांना दारू देताना त्यांचं वय तपासलं आहे की नाही या बाबी तपासल्या जात आहेत. प्रवेश देतानाही गिऱ्हाईकाच्या वयाचा दाखला तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर उद्या वय न तपासता प्रवेश दिला, तर परवाना रद्द करणं, फौजदारी गुन्हा दाखल करणे अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही फडणवीसांनी यावेळी दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube