Download App

नितीन गडकरींना दूर सारण्याचा कट नाही ना ? रोहित पवारांना शंका

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar On Nitin Gadkari : दिल्ली ते गुरुग्रामला जोडण्यासाठी बनविण्यात येत असलेल्या द्वारका एक्स्प्रेस वेच्या एका किलोमीटरसाठी होत असलेल्या खर्चावर कॅगने ठपका ठेवला आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी अंदाजापेक्षा जास्त खर्च झाल्याचा दावा कॅगच्या ऑडिट रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. त्यावरून सरकारवर विरोधकांनी निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. तर काही जणांनी थेट केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची बाजू घेण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नितीन गडकरी यांची बाजू घेणारे ट्वीट केले आहे.

शरद पवारांच्या टीकेला धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर! म्हणाले, ‘देवाने भक्ताला मनातून काढलं पण..,’

केंद्र सरकारची एकमेव जमेची बाजू आणि सर्वाधिक कार्यक्षम मंत्रालय म्हणजे आदरणीय नितीन गडकरी साहेबांचे रस्ते निर्माण मंत्रालय. सध्याच्या केंद्र सरकारमधील कुठला मंत्री सर्वाधिक आवडतो, असा प्रश्न देशातल्या नागरिकांना केला तर प्रत्येकाचं उत्तर नितीन गडकरी हेच असेल, यात कुठलीही शंका नाही. कॅग अहवालाच्या बातम्या वाचनात आल्या असल्या तरी याचा विस्तृत अभ्यास केलेला नाही, परंतु कॅग अहवालाच्या निमित्ताने केवळ गडकरी यांच्या विभागावर लक्ष केंद्रित करून त्यांना जाणूनबुजून अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे, असे वाटते, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Chandrashekhar Bawankule : ‘महायुतीला विधानसभेत 200+ अन् लोकसभेत 45+ जागा मिळणार’

शेवटी मराठी माणसाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न दिल्लीत होणारच आहे. केंद्र सरकारच्या अपयशी कारभारामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपा विजयी होणार नाही हे स्पष्ट आहे. तर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास गडकरी हे सर्वाधिक पसंतीचा चेहरा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्पूर्वीच त्यांचा पत्ता कट करुन त्यांना दूर सारण्याचा तर हा कट नाही ना, अशी शंकाही रोहित पवारांना उपस्थित केली.

महाराष्ट्र भाजपा गडकरी यांच्याबरोबर असेल की नाही हे माहीत नाही, असे टोलाही रोहित पवारांनी लगावला आहे. परंतु विकासाची दूरदृष्टी असलेल्या गडकरी यांच्यासोबत मराठी माणूस म्हणून मी नक्कीच उभा राहीन, अशी भूमिका रोहित पवारांनी जाहीर केली आहे.

Tags

follow us