Download App

‘मुलाचा फोन, पप्पा लवकर या आपलं घर जळंतयं’; क्षीरसागरांनी अधिवेशनात मांडली व्यथा

Sandip Kshirsagar : माझं घर जळत असताना मुलगा वारंवार फोन करीत होता, पप्पा लवकर या आपलं घरं जळत आहे, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी जाळपोळ घटनेची व्यथा हिवाळी अधिवेशनात मांडली आहे. दरम्यान, जाळपोळच्या घटनेप्रकरणी आज क्षीरसागर यांनी अधिवेशनात आवाज उठवला आहे. जाळपोळच्या घटनेप्रकरणा न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी संदीप क्षीरसागर यांनी यावेळी केली आहे.

इंग्लंडचे 136 धावांवर लोटांगण, टीम इंडियाकडे मोठी आघाडी; शर्माची घातक गोलंदाजी

संदीप क्षीरसागर म्हणाले, माझ्या घरापर्यंत जे लोकं आले होते. त्यांनी संपूर्ण प्रकार प्लॅन करुन घडवून आणला आहे. आधी प्लॅनिंगने माझ्या घराच्या लाईटीचं कनेक्शन तोडलं. हे लोकं आल्यानंतर पोलिसांची गाडी बाजूला सरकली. माझं घरं पूर्ण एक तास जळत असतानाच कुटुंबातून माझा लहान मुलगा मला वारंवार फोन करीत होता. पप्पा लवकर या आपलं घर जळतंय, असं तो म्हणत होता. मी पोलिस प्रशासनाला वारंवार संपर्क केला मात्र, पोलिसांकडून म्हणावी तशी कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.

Manoj Jarange : ‘आरक्षणाचं काय केलं, 17 डिसेंबरपर्यंत सांगा, अन्यथा’… जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम !

तसेच माझ्या घराच्या बाजूला पोलिस मुख्यालय आहे. तिथं पोलिसांचा फौजफाटा असतानाही असं घडलं. पोलिसांच्या फिर्यादीवरुन बुलेटच्या गोळ्या धुराच्या कांड्या चालवल्याचं सांगितलं गेलं पण असं काही घडलं नाही. या प्रकारातून माझं कुटुंब वाचलं आहे. माझं घर पेटवल्यानंतर 7-8 तास घर पेटवणारे पायी चालत गेले
पोलिस त्यांच्यासोबत होते, त्यावेळी हे लोकं एकमेकांना फोन करुन सांगत होते, या घटनेला क्रमांक देण्यात आले होते, पेट्रोल, फॉस्परस बॉम्बचा वापर झाला. त्यामुळे हे सगळं प्लॅन करुनच घडवून आणलं असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.

‘ती ऑडिओ क्लिप खोटी, फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी करणार…’; बबनराव लोणीकरांचा खुलासा

जाळपोळीच्या घटनेनंतर या लोकांनी बस स्टॅंडमध्ये तोडफोड केली. तिथं सिव्हील हॉस्पिटलमध्ये तोंड धुतलं आणि निघून गेले. त्यांच्या गाड्यांचे नंबरचे सर्व फुटेज आहे. हे लोकं एकमेकांशी संवाद साधून सांगत होते की या नंबरला जा तिकडं. या घटनेमागचा मास्टमाईंड कोण? ते शोधून काढणं गरजेचं असून घटनेची न्यायालयीन झाली पाहिजे, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.

Tags

follow us